मुंबई, दि. 21 (लोकाशा न्यूज) : दहावीचा निकाल कधी जाहीर होणार असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांकडून विचारला जात असताना येत्या 27 मे रोजी दहावीचा निकाल लागू शकतो, असं शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेतून दिली आहे.
मंगळवारी 12 वीचा निकाल जाहीर झाला, उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी अभिनंदन केले आहे, ज्या मुलांना कमी मार्क मिळाले आहेत, ती मुलं पुन्हा परिक्षेला बसू शकतात, परीक्षा लवकर घेण्याची सुचना केल्या आहेत. बारावीमध्ये कमी गुण मिळाले आहेत, ते देखील पुन्हा परिक्षेला बसू शकतात, साधारण जुलैमध्ये ही परिक्षा होईल, ऑगस्टमध्ये निकाल लागतील, असे केसरकर यांनी म्हटले आहे.