बीड, दि. 13 :(जिमाका ) बीड लोकसभा मतदार मतदारसंघाच्या निवडणुकीकरीता मतदारसंघात सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वाजेपर्यंत सुमारे 68% टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
या यामध्ये आष्टी 69%, बीड62%, गेवराई 65%, केज 68%., माजलगाव 68%, परळी 75% विधानसभा मतदार संघात मतदान झाले. मतदानासाठी सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसत होता.
बीड लोकसभा मतदारसंघांमध्ये 15 आदर्श मतदान केंद्र होते.
यामध्ये 288-गेवराई 2, 239-माजलगाव -2, 230- बीड -2 231-आष्टी -5, 232-केज -4 व 233 परळी -1 हे होते.
दिव्यांग, महिला, नव मतदार, तृतीयपंथी सर्वांनी उत्साहपूर्णपणे मतदान प्रक्रियेत भाग घेऊन मतदानाचा हक्क बजावला. बीड लोकसभा मतदारसंघांमध्ये 11 दिव्यांग मतदान केंद्र होते, 55 महिला मतदान केंद्र, 316 परदानशी केंद्र होती.
0000