बीड

आश्वासक नेतृत्व म्हणून पंकजाताई मुंडे यांना सर्व स्तरातून वाढता पाठींबा, मातंग समाज, टकारी समाज, कैकाडी समाजाच्या पाठींब्याने पंकजाताईंचे मताधिक्य वाढले, सर्व घटकांच्या विकासात सातत्य ठेवणार ; खा.प्रितमताई मुंडे यांनी दिला विश्वास

बीड । दि. ०५ । भाजपा आणि महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ काल ( शनिवार ) खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील टकारी समाज, मातंग समाज, कैकाडी समाज यांच्या बैठकी घेतल्या. सर्वांच्या सोबतीने बीड जिल्ह्याच्या विकासाला नवी उंची देणाऱ्या सर्वसमावेशक उमेदवार म्हणून सर्वांनी पंकजाताई मुंडे यांना जाहीर पाठिंबा दिला. दरम्यान बीड लोकसभा क्षेत्रात लक्षनीय मतदार संख्या असलेल्या या तीन समाज घटकांनी पाठींबा दिल्यामुळे महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांचे मताधिक्य वाढले आहे.

महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारानिमित्त खा. प्रितमताई मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील विविध समाज घटकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला. राज्याच्या ग्रामविकास मंत्री असताना पंकजाताई मुंडे यांनी सर्वसमाजांना सोबत ठेवून बीड जिल्ह्यात विकासाचा पाया रचला, त्यांच्या सर्वसमावेशक नेतृत्वामुळे बीड जिल्ह्यात सामाजिक सलोखा अबाधित आहे. जिल्ह्याचे सामाजिक सौहार्दय टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी पाठींबा दिल्याबद्दल आभार मानून सर्व घटकांच्या विकासात यापुढेही सातत्य ठेवणार असल्याचे खा. प्रितममुंडे म्हणाल्या.

दरम्यान बीड शहरात खा. प्रितमताई मुंडे यांच्या आणि अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांच्या प्रमुख उपस्थितीत मातंग समाजाचा मेळावा संपन्न झाला. बीड जिल्ह्यातील सर्व मातंग समाज एकजुटीने पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी उभा राहणार असल्याची ग्वाही याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजकांनी दिली. तर बीड तालुक्यातील शिरापूर येथे टकारी समाजाच्या विजय संकल्प मेळाव्यात टकारी समाज, कैकाडी समाज, दंडम अण्णा मित्र मंडळाने पंकजाताई मुंडे यांना जाहीर पाठिंबा दिला.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!