बीड

बीड लोकसभेच्या मतदानाला उरले फक्त पंधरा दिवस, जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांनी बीड आणि गेवराई विधानसभा मतदार संघांची केली पाहणी



बीड, दि.27 (लोकाशा न्यूज) : जिल्हा निवडणूक अधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी निवडणूकीच्या धर्तीवर  शनिवारी बीड आणि गेवराई विधानसभा मतदार संघांची पाहणी केली. जिल्हा परिषद शाळा गेवराई मतदान केंद्र येथील मुलभुत सुविधा व्यवस्थेची पाहणी केली. याठिकाणी मतदारांसाठी मतदानानंतर असलेला सेल्फी पॉईंट उभारले आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांना त्यांच्या प्रचार प्रसाराकरीता लागणार्‍या पूर्वपरवानगी अनुमति देण्यासाठी  निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार कार्यवाही सुरू आहे का याबाबतचा आढावा नगरपरिषद कार्यालय गेवराई येथे जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी घेतला. यासह या मतदार संघात 85 वर्षाच्या वरचे तसेच दिव्यांग मतदारांसाठी आयोगाने निर्धारित केलेल्या नियमानुसार कामे करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. बीड विधानसभा मतदार संघात आयोगाकडून आलेल्या साहित्य स्वीकृती व वितरण कक्षाला भेट देऊन पाहणी केली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!