बीड/वडवणी ( लोकाशा न्युज ) : गुरुवारी दुपारी बीड जिल्ह्याला अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले, जिल्ह्यातील धारूर, वडवणी आणि गेवराई या तीन तालुक्यात गारांचा प्रचंड मारा झाल्याचे पाहायला मिळाले विशेष म्हणजे या अवकाळी ने धारूर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात पाणीही आले होते.
वडवणी तालुक्यात काल दुपारी अचानक झालेल्या विजेच्या कडकडाटास गारांच्या पावसाने शेतकर्यांची चांगलीच तारांबळ उडाली तर शेतकर्यांच्या शेतातील आंबा टरबुज खरबुज,गहु,ज्वारी,बाजरी अदी पिकांचे मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान झाले आहे.शेतकर्यांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.
वडवणी तालुक्यातील शेतकरी अगोदरच दुष्काळामध्ये होरपळत असतांना काल दुपारी झालेल्या विजेच्या कडकडाटासह गारांच्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील मोठमोठी झाडे उन्मळून पडली तर अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेली.आनेक ठिकाणी रोडवर झाडे पडल्याने काही काळ वाहातुक ठप्प झाली होती. तालुक्यातल डोंगर पट्यात मोठ्या प्रमाणात गारा पडल्याने चौफेर गारांचे थर साचले होते.उन्हाळ्यातच नदी ओढ्या नाल्यांना पाणी आले.आचानक आलेल्या पावसामुळे शेतात काम करत आसलेल्या शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.शेतकऱ्यांच्या शेतातील आंबा टरबूज खरबूज उन्हाळी पिक गहू ज्वारी बाजरी कांदा भाजीपाला आदी पीक भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे काही क्षणात होते च्या नव्हते झाले व हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेहल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे.तालुक्यातील डोंगर पट्ट्यातील चिंचवन कोठारबन पारगाव दहिफळ पिंपळ टक्का रुई पिंपळा सोन्ना खोटा चिखलबीड पिंपळा रुई खडकी देवळा लोणवळ बाबी कुप्पा आदी गावातील शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी शासनाने तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.