बीड।दिनांक ०७।
लोकसभा निवडणूकीसाठी येत्या १३ मे रोजी मतदान होत आहे. तब्बल २१ लाख १५ हजारे ८१३ इतके मतदान असलेल्या बीड जिल्ह्यात भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांना भाजप महायुतीने बीड लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर पालकमंत्र्यांसह भाजप महायुतीचे सर्व आमदार, माजी आमदार, जिल्हाध्यक्ष आदी नेत्यांसह महायुतीचे तालुका व गावपातळीवर काम करणारे पदाधिकारी, कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. पंकजाताईंना विक्रमी मतांनी निवडून देत लोकसभेत मान-सन्मानाने पाठवण्याचा निर्धार सर्व जण विविध ठिकाणी बोलून दाखवत आहेत.
सध्या पंकजाताई मुंडे यांनी नुकताच प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण करून दुसरा टप्पा सुरू केला आहे. गावोगावी महायुतीचे कार्यकर्ते तसेच पालकमंत्री धनंजय मुंडे यांचेसह आमदार सुरेश धस, आ. प्रकाश सोळंके, आ. लक्ष्मण पवार, आ. बाळासाहेब आजबे, आ. नमिता मुंदडा, माजी आमदार केशवराव आधळे, भीमराव धोंडे, अमरसिंह पंडित, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुखांसह नेते मंडळी पंकजाताईंच्या प्रचारार्थ आपल्या बुथ पातळीवर अधिकाधिक मतदान मिळवून देण्यासाठी पायाला भिंगरी लावून फिरत आहेत.
यापूर्वी राज्य मंत्रीमंडळात स्वत:ची छाप पाडणारे काम करत जनमानसात दिवगंत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे विचार कायम ठेवणार्या पंकजाताई मुंडे यांच्याबद्दल जिल्ह्यातील भाजप-महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांबद्दल प्रचंड आदरभाव आहे. आता लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने पंकजाताईंना मोठ्या मताधिक्क्यांनी निवडून आणायचेच, असा निर्धार महायुतीचे कार्यकर्ते करु लागले आहेत. प्रत्येकाने आप-आपला बुथ सांभाळायचा, अन् अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचून महायुतीची विचारधारा त्यांच्यापर्यंत पोहचवायची असे नियोजन सर्व बुथप्रमुख करु लागले असून आगामी एक महिन्यात कटाक्षाने प्रचारयंत्रणा सक्षम ठेवतानाच नवीन आणि यंदा पहिल्यांदाच मतदान करणार्या मतदारांपर्यंत संपर्क साधून भाजप-महायुतीचे कार्यकर्ते ‘मोदी सरकार’ची कार्यप्रणाली आणि धोरणे त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचे काम करण्यास सज्ज झाली आहे.
याबरोबरच मागील दहा वर्षात केद्रांतील भाजप-एनडीए सरकारने गोरगरिब, वंचित, उपेक्षित कष्टकरी, कामगार यांच्यासाठी राबवलेल्या विविध योजना अन् त्यातून लाभ मिळालेल्या नागरिकांची भावना किती चांगली आहे, याबाबतचे सुक्ष्म नियोजन करत महायुतीचे सर्व कार्यकर्ते गावोगावी सरकारचे हे काम मतदारांपर्यंत पोहचवत आहेत. पंकजाताईंना विक्रमी मतांनी निवडून देत केंद्रात पुन्हा एकदा देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘अब की बार ४०० सो पार’ चा नारा देतांना दिसत आहेत. गाव-वाडी-वस्ती-तांड्यापर्यत पोहचून पंकजाताईंना मतदान करण्याचे आवाहन कार्यकर्ते करत आहेत.