बीड

शिवजयंतीसाठी एसपींची खाकी सज्ज !, जयंती होणार डीजे मुक्त, शहरातील बॅनर हटवले जाणार, नशाखोरांना कारवाईचा दणका बसणार,शिवजयंती सामाजिक सलोख्यासह उत्साहात साजरी करा, एसपींनी शांतता कमिटीच्या बैठकीत केली आवाहन

 
बीड, दि. 16 (लोकाशा न्यूज) :  छञपती शिवाजी महाराज जयंती अनुषंगाने पोलीस ठाणे बीड शहर पोलिस ठाणे येथे संपुर्ण उपविभागाचे शांतता समितीची बैठक पार पडली. या बैठकीसाठी सर्व शांतता समितीचे शहारातील सदस्य, शहारातील सर्व समाजाचे प्रतिष्ठित नागरिक, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय अधिकारी विश्वंभर गोल्डे तसेच बीड उप विभागातील सर्व पोलीस स्टेशनचे ठाणेदार हे हजर होते.
  या बैठकीमध्ये सर्व सदस्यांनी शिवजयंती अनुषंगाने समस्या मांडल्या आणि त्यावर काम करण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक यांनी दिले. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी निवेदन केले की, शहरात अठरा पगड जातीतील लोक सदैव एकत्र येतात आणि सर्व सण उत्सव उत्साहाने साजरे करतात, ही बाब बीडसाठी अभिमानास्पद आहे. याही शिवजयंती कार्यक्रमात सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन  पोलीस अधीक्षकांनी केले.तसेच आगामी सण/उत्सव/मिरवणुका यामध्ये ऊग मूळे ध्वनी प्रदूषण होऊन आरोग्यविषयक धोका निर्माण होतो त्यामुळें डीजे मुक्त बीड शहर करण्यासाठी सर्वांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले तसेच कारवाई करण्याचे संकेत दिले.  तसेच मा पोलीस अधीक्षक ठाकूर यांनी शहरातील छत्रपती शिवाज महाराजांच्या पुतळा, इतर सर्व चौक तसेच शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेले अवैध बॅनर संबंधित विभागाच्या समन्वयाने काढून बीड शहर बॅनरमुक्त करण्याबाबत शहरातील सर्व ठाणे प्रभारी यांना सूचना दिल्या आहेत. तसेच सार्वजनिक कार्यक्रम दारुमुक्त करण्यासाठी पोलिसांना कारवाया करण्याचे आदेशीत केले. नशा करणारे आणि त्याच्या औषधे विकणारे यांच्या विरुद्ध पुन्हा एकदा कठोर कारवाईसाठी शहरातील प्रभारी अधिकारी यांना आदेशीत केले आहे. जयंती आणि पूर्ण उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडावा असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर यांनी केले आहे.

डीजे मुक्त जयंती, सामुहिक उत्सव
साजरे करावेत – डीवायएसपी गोल्डे
बीड शहर येथे शांतता कमिटीची बैठक शिवजयंती अनुषंगाने घेण्यात आली. यात सर्वांनी जयंती संदर्भात वेगवेगळ्या सुचना मांडल्या. सदस्यातर्फे जयंती दिवशी ट्रॅफिकचे नियोजन, विद्युत आणि पाणी पुरवठा, शिवाजी महाराज पुतळ्या भोवती रस्त्यावर बॅनर नको, अशा सुचना मांडण्यात आल्या. त्यावर या सर्व मागण्या विषयी तात्काळ कार्यवाही करण्यात येईल, अशी भुमिका यावेळी बीडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्डे यांनी मांडली. तसेच डीजेमुळे लहान मुले, वृध्दांना त्रास होतो. मिरवणूकीत वाद होतो, भांडण तंटे होतात, सर्वांच्या प्रगतीचा मार्ग  खुंटतो. यामुळे डिजेशिवाय इतर पारंपरिक वाद्य लाऊन, पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढावी, ज्यात सर्व समान वयातील अबाल वृद्धांचा, सर्व समाजाचा समावेश व्हावा अशी आदर्श मिरवणूक साजरी व्हावी, असे आवाहन करण्यात आले. तसेच प्रातःकाळी आदर्श देखाव्यासह, डीजेमुक्त जयंती ही आदर्श समजण्यात येईल आणि अशा मिरवणुकीस पुरस्कार देण्यात येईल अशी स्पष्ट भुमिका यावेळी डीवायएसपी गोल्डेंनी मांडली. 

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!