दिल्ली, बीड, दि. 1 (लोकाशा न्यूज) : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प गुरूवारी संसदेत सादर केला, रेल्वेचा अंतरिम अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला 15 हजार 554 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. त्यानुसार नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी तब्बल 275 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या मदतीच्या याच पावसामुळे भविष्यात बीड जिल्हवासियांचे रेल्वेचे स्वप्न पुर्ण होणार आहे, याबद्दलच बीड जिल्ह्याच्या खा. प्रीतमताई मुंडे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.
गुरूवारी संसदेत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील रेल्वे मार्गिकेला घसघसीत निधी आल्याचं चित्र आहे. नवी रेल्वे मार्गिका, दुसरी, तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका यासाठी देखील निधी दिला जाणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे केंद्र सरकार पुन्हा पुन्हा बीड जिल्ह्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत असल्याचे या अर्थसंकल्पातून स्पष्टपणे दिसून आहे. कारण बीड जिल्हावासियांच्या स्वप्नातील नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी शेवटच्या अर्थसंकल्पात तब्बल 275 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. वास्तविक पाहता हा मार्ग वेळेत पुर्ण व्हावा यासाठी बीड जिल्ह्याच्या तात्कालिन पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याच्या खा. प्रीतमताई मुंडे ह्या आपल्या जीवाचे राण करीत आहेत. ज्या ज्या वेळी या रेल्वे मार्गात अडथळे आले त्या त्या वेळी खा. प्रीतमताईंनी पुढाकार घेवून ते अडथळे सोडविण्याचे काम खर्या अर्थाने केलेले आहे. त्यांच्या याच प्रयत्नामुळे आज नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाच्या कामाला मोठा बुस्टर मिळालेला आहे. या रेल्वे मार्गाचे काम सध्या प्रचंड गतीने सुरू आहे, अंमळनेरपर्यंत काम पुर्ण झालेले आहे, येत्या काहीच दिवसात हे काम बीडपर्यंत पोहचून ते परळीपर्यंत जाणार आहे. विशेष म्हणजे गुरूवारच्या अर्थसंकल्पातून केंद्र सरकारने केलेली 275 कोटींची तरतूद खर्या अर्थाने नगर-बीड-रेल्वे मार्गाच्या कामाला प्रचंड प्रमाणात गती देणार आहे. यामुळेच जिल्ह्याच्या खा. प्रीतमताईंनी मुंडे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.
खा. मुंडे बैठक घेवून दिल्लीत गेल्या
अन् बीड रेल्वेला 275 कोटींचा निधी मिळाला
नगर-बीड-परळी रेल्वे मार्ग पुर्ण व्हावा, यासाठी स्व.गोपीनाथराव मुंडे यांनी नेहमीच प्रयत्न केलेले आहेत. अगदी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच पंकजाताईं आणि खा. प्रीतमताईंनी या मार्गासाठी कोट्यवधींचा निधी खेचून आणला, विशेष म्हणजे या रेल्वे मार्गावर खा. मुंडेंचे बारीक लक्ष आहे, मागच्या चार दिवसांपुर्वीच त्यांनी यासंदर्भात जिल्हा प्रशासन आणि रेल्वेच्या अधिकार्यांसोबत बैठक घेवून गतीने काम करावे, अशा सुचना केल्या होत्या. खा. मुंडेंच्या या कामाची दखल घेवूनच केंद्र सरकारने या रेल्वे मार्गासाठी तब्बल 275 कोटींची तरतूद केली आहे.