बीड

फार्मर आयडीच्या कामात बीड जिल्हा देशात पहिल्यास्थानावर, जिल्हाधिकारी स्वतःला झोकून देऊन काम करू लागल्या, दिल्ली दौऱ्यामुळे कामाला आणखी मिळाली गती, लवकरच फार्मर आयडीवरून शेतकर्‍यांना सर्व योजनांचा घेता येणार फायदा, शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या या योजनेची लवकरच पंतप्रधान करणार घोषणा


बीड, 8 : शेतकर्‍यांसाठी अनेक योजना आहेत. यामध्ये शेतीक्षेत्राची नोंद एका फार्मर आयडीमध्ये करून पीक कर्ज, पीक विमा, शेती पुरस्कृत योजना, बँकांकडील कर्जाच्या योजना, शेतकर्‍यांसाठी पशुधनाची योजना यासाठी महसूल प्रशासनाने शेतकर्‍यांच्या आधार लिंकला सातबारा जोडणे यासाठी केंद्र सरकारकडून बीड जिल्ह्याची पायलट जिल्हा म्हणून गेल्या तीन महिन्यांपूर्वी निवड केली होती. या पायलट प्रकल्पांतर्गत महसूल विभागाने तलाठी, ग्रामसेवक यांच्यामार्फत जिल्ह्यातील जवळपास ऐंशी टक्के शेतकर्‍यांची नोंद सातबारावर त्यांच्या आधारलिंकवर केली आहे. त्यामुळे देशपातळीवर जे सात जिल्हे निवडले होते त्यात बीड जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे या कामासाठी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ ह्या झोकून देऊन काम करत आहेत. याच कामाच्या अनुषंगानेच त्यांनी नुकतीच दिल्ली वारी ही केली होती.
अनेक वेळा शेतकर्‍यांना शेतीसंबंधी कागदपत्रे घेण्यासाठी तलाठ्याकडे सारखे चकरा माराव्या लागतात. तलाठ्याकडून कागदपत्रे घेऊन पीक कर्ज, बँकांच्या इतर शेती निगडीत योजना, फळपीक लागवड करणे, शेतीशी निगडीत पशुधनाच्या योजना यासाठी अनेक वेळा कागदपत्रांची पुर्तता करूनही बँकेत चकरा माराव्या लागतात. सेतु केंद्रावरून पीक विमा भरावा लागतो. मात्र बँका आणि इतर सरकारी योजना मिळवण्यात शेतकर्‍यांना यश येत नाही. अनेक वेळा बँका शेतकर्‍यांना कर्जासाठी आपल्या बँकेतून बाहेर काढतात, त्यामुळे गेल्या तीन महिन्यापूर्वी देशातील 38 राज्यातून सात राज्य निवडून त्यात प्रत्येक राज्यातून एक जिल्हा हा प्रायोगीक तत्वावर निवडण्यात आला होता. त्यामध्ये महाराष्ट्रातून एकमेव बीड जिल्ह्याची निवड केंद्र सरकारने या पायलट प्रकल्पासाठी केली होती. या सात जिल्ह्यांपैकी देशात एकमेव बीड जिल्ह्याने पायलट प्रकल्पातच ऐंशी टक्के शेतकर्‍यांचा फार्मर आयडी हा तयार केलेला आहे. लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी या पायलट प्रकल्पानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या फार्मर आयडी योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या योजनांची घोषणा दिल्ली येथून करणार आहेत. त्यामध्ये बीड जिल्ह्याचे नाव आणि संदर्भ पंंतप्रधान मोदी हे देण्याची शक्यता आहे, यासाठी बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे ह्या स्वतःला झोकून देनुन काम करत आहेत, मागच्या तीन दिवसांपूर्वी त्यांनी दिल्ली दौरा केला होता. त्यांच्या या दिल्ली दोऱ्या नंतर आता या कामात आणखी गती मिळाल्याचे पहायला मिळत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!