बीड

मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये एकाची गळफास घेऊन आत्महत्या


बीड, दि. 22 (लोकाशा न्यूज) : मुख्यमंत्री शिंदे साहेब माझा राम राम.. मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी चिठ्ठी लिहून ठेवून 50 वर्षीय व्यक्तीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बीड शहरातील बार्शी नाका परिसरत उघडकीस आला आहे. मधुकर खंडेराव शिंगण असं आत्महत्या केलेले व्यक्तीचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी दिली आहे, त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब राम राम मराठ्यांना आरक्षण मिळालाच पाहिजे मी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करीत आहे मनोज जरांगे पाटील हे चांगलं काम करत आहेत त्यांनी माझ्या कुटुंबाला भेट द्यावे असे चिठ्ठी मध्ये लिहिलेला आहे. आज बीडमध्ये मनोज जरांगे  पाटील यांची इशारा सभा होणार आहे त्या सभेपूर्वीच आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केले जात आहे.. बीड जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत दहा ते पंधरा मराठा बांधवांनी जीवन संपवले आहे जरांगे पाटील वारंवार आत्महत्या करू नका असे आवाहन करत असतानाही लोकांचा धीर सुटत असल्याने सरकारने तातडीने मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेणे गरजेचे आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!