बीड, दि. 19 (लोकाशा न्यूज) : कोर्टाची प्रकरणे दाबून ठेवल्याप्रकरणी सीईओ अविनाश पाठक यांनी शिक्षण विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी गिरीष बिजलवाड, कनिष्ठ प्रशासन अधिकारी नायगावकर यांच्यासह अन्य एकास निलंबित केले होते, सीईओंनी केलेल्या या कारवाईमुळे बीड जिल्हा परिषदेमध्ये मोठी खळबळ उडाली होती, याबरोबरच या विभागातील कोर्टाची प्रकरणे मार्गी लावण्यासाठी सीईओंनी इतर विभागाच्या काही अधिकार्यांवर महत्वाची जबाबदारीही सोपविलेली आहे. त्याचबरोबर आता या विभागातील रिक्त असलेल्या सहाय्यक प्रशासन अधिकारी पदी एस.ए. आदमलवाड आणि कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून भागवत थापडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात सीईओंनी मंगळवारी लेखी आदेश काढले आहेत. तर वरिष्ठ सहाय्यकाचे पद अद्याप रिक्त असून या पदाचा अतिरिक्त पदभार शिक्षण विभागातील इतर अधिकार्याकडे दिला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.