बीड, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या दणक्याने जिल्ह्यातील वाळू माफियांची अक्षरक्ष: झोपच उडाली आहे. मागच्या दहा महिण्यात त्यांच्या नेतृत्वात झालेल्या 118 कारवयांमधून जवळपास चार कोटी चार लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबद्दल पोलिस अधीक्षक आणि त्यांच्या पथकाच्या कामाचे जिल्हाभरातून कौतूक केले जात आहे.
वाळूची चोरी रोखण्यासाठी सरकार वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत असते. असे असतानाही वाळूची चोरी मात्र काही केल्या थांबत नाही, अशा वातावरणात बीड जिल्ह्यात वाळू चोरी करणार्या माफियांची पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी चांगलीच झोप उडवलेली आहे. ज्या ठिकाणी वाळूची चोरी होत आहे त्या ठिकाणी तात्काळ छापेमारी करून वाळू माफियांना दणक्यावर दणके देण्याचे काम पोलिस अधीक्षकांनी सातत्याने केले आहे. त्यांच्या नेतृत्वात यापुर्वी एपीआय विलास हजारे यांनी तर आता एपीआय गणेश मुंडे यांनी कारवयांची कमान यशस्वीरित्या संभाळलेली आहे. त्यानुसार मागच्या दहा महिण्यात पोलिस अधीक्षकांच्या पथकाने केलेल्या 118 कारवयांमधून वाळू आणि इतर ऐवज असा जवळपास चार कोटी 4 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. याबद्दल पोलिस अधीक्षक आणि त्यांच्या पथकाच्या कामाचे जिल्हाभरातून कौतूक केले जात आहे.