बीड

जिल्ह्यात भाजपला आणखी मिळणार बळ !सुरेश कुटे भाजपमध्ये करणार प्रवेश, दिवाळीनंतर दिल्लीत अमित शहांच्या प्रमुख उपस्थितीत होणार प्रवेश


बीड, दि. 9 (लोकाशा न्यूज) : शून्यातून विश्व निर्माण करणारे, बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र तथा सर्वसामान्य कुटुंबातील युवा उद्योजक सुरेश कुटे यांनी स्वतःच्या कर्तुत्वावर, जिद्दीवर उद्योग क्षेत्रात येत भरारी घेतलेली आहे. त्यांच्यामुळे हजारो बेरोजगारांना रोजगार मिळालेला आहे. आपल्या उद्योग क्षेत्रातून त्यांनी जगभरामध्ये बीड जिल्ह्याचे नाव लौकिक केलं, त्यातच मध्यंतरी काही अडचणी आल्या. आता कुटे ग्रुपचे सर्वेसर्वा सुरेश कुटे हे भाजपात प्रवेश करणार असल्याचे  जवळपास निश्‍चित झाले आहे. दिपावली नंतर सुरेश कुटे यांचा हे भाजपामध्ये अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थिती प्रवेश होणार आहे. दिल्लीत हा प्रवेश होणार आहे. त्यांच्या प्रवेशामुळे आगामी काळात बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात भाजपचे बळ आणखी वाढणार आहे.
वास्तविक पाहता बीड जिल्ह्याकडे एक मागासलेला जिल्हा म्हणून पाहिले जात होते, मात्र मागच्या दहा वर्षांपासून बीड जिल्हा हा आता विकासाच्या प्रवाहात येऊ लागला आहे. विशेष म्हणजे हे चित्र बदलण्यासाठी येथील तळागाळातील युवक जोमाने प्रयत्न करत आहेत.  यामध्ये एमपीएससी, यूपीएससी करणारे युवा असतील, उद्योग क्षेत्रातील युवा असतील किंवा विविध क्षेत्रात आपलं अस्तित्व निर्माण करणारे बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र असतील, हे सर्व युवा मिळून आता बीड जिल्ह्याचे चित्र बदलण्यासाठी पुढाकार घेत आहेत. यात विशेष म्हणजे बीड जिल्ह्याचे  भूमिपुत्र तथा सर्वसामान्य कुटुंबात ज्यांचा जन्म झाला असे सुरेश कुटे यांनी स्वतःच्या कर्तुत्वावर, जिद्दीवर कुटे समूह उभा केला.  हा समूह उभा करत असताना त्यांना अनेक अडचणी आल्या, परंतू, या अडचणीवर मात करत त्यांनी कुटे ग्रुप जगभरामध्ये पसरविला.  हे करत असताना हजारो बेरोजगारांना रोजगार देण्याचे काम सुद्धा कुटे ग्रुपने केले. परंतू मध्यंतरीच्या कारवाया झाल्या यानंतर मात्र कुटे ग्रुप अडचणीत सापडला. ज्ञानराधा बँकेत ठेवलेल्या ठेवी सुरक्षित की असुरक्षित? या भितीतून ठेवीदाराने ठेवी घेण्यास गर्दी केली. यानंतर सुरेश कुटे यांनी विश्वास पटवून देत काही अडचणी आल्या, परंतू तुमचा पैसा सुरक्षित आहे, तुमचे पैसे देण्यास आम्ही सर्व तत्पर आहोत. फक्त आम्हाला थोडा अवधी द्या,  यानंतर ठेवीदाराने परत ज्ञानराधावर  विश्वास ठेवला आणि काही दिवस  मुदत दिली. या सर्व वेगवान घडामोडी होत असताना दुसरीकडे आता सुरेश कुटे दिपावलीनंतर भाजपात प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे.

ठेवीदारांच्या ठेवीही लवकरच मिळणार
मुळात सुरेश कुटे यांचा हा प्रवेश दिपावली पूर्वीच होणार होता,  परंतु जोपर्यंत ठेवीदारांचे पैसे देण्यास आम्ही सुरुवात करत नाहीत तो पर्यंत मी राजकीय प्रवेश करणं योग्य ठरणार नसल्याचे मतही सुरेश कुटे यांनी व्यक्त केल्याची विश्वसनीय माहिती आहे. यामुळे दिवाळीनंतर ठेवीदारांना पैसे देण्यास सुरुवात होईल आणि त्यानंतर सुरेश कुटे हे भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती समोर येत आहे.

कुटेंमुळे जिल्ह्याला होणार मोठा फायदा
राजकारणामध्ये नविन  चेहरा आल्यास सर्वसामान्य वर्ग त्या व्यक्तीला पसंती देतो. यामुळे राजकारणात नव्याने येणारे कुटे ग्रुपचे सर्वेसर्वा सुरेश कुटे यांनी उद्योग क्षेत्रामध्ये ज्या प्रकारे आपले अस्तित्व निर्माण केलं त्याच प्रकारे राजकारणात आल्यानंतर त्यांना त्यांचे अस्तित्व निर्माण करता येईल.  त्यांचा जिल्ह्याला मोठा फायदा होईल असे दिसत आहे.  यामुळे येणारा काळच ठरवेल की बीड जिल्ह्यातील राजकीय चित्र कसे असेल व सुरेश कुटे यांचा जिल्ह्याला कितपत फायदा होईल.

प्रवेशाला दिग्गज नेत्यांची राहणार उपस्थिती
बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र सुरेश कुटे यांनी ज्या प्रकारे आपलं एक अस्तित्व निर्माण केलं,  ते सर्वांना हेवा वाटावे असेच आहे. परंतु आता त्यांची वाटचाल राजकीय क्षेत्रात होणार असून अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये ते भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. या प्रवेश सोहळ्याला राज्यातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती राहणार आहे. सुरेश कुटे यांचा राजकीय प्रवास कसा राहील त्याचा जिल्ह्याला किती फायदा होईल असे अनेक प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!