बीड दि.१७ (प्रतिनिधी)-आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने गुन्हेगारी प्रवृतीच्या गुंडांना स्थानबद्ध करून त्यांची हर्सूल कारागृहात रवानगी करण्याचे काम पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर मोठ्या जोमाने करीत आहेत.आज (दि.१८) घरफोड्या,जबरी चोरी,दरोडा टाकणाऱ्या टोळीतील पाच जणांना स्थानबद्ध करण्यात आले.मागच्या दोन दिवसात सात जण हद्दपार झाले आहेत.
प्रतीक युवराज भोजने,मिलिंद प्रभाकर साळवे या दोन गुंडांना काल हद्दपार केल्यानंतर आज पुन्हा संजय ऊर्फ संज्या रामदास पवार (रा. सावरगाव ता. गेवराई),संतोष हनुमान धनगर (रा. गोपाळवस्ती गेवराई),ज्ञानेश्वर श्रावण माळी (रा.गोपाळवस्ती गेवराई),विशाल बाबासाहेब जाधव (रा.महाळस पिंपळगाव सांगवी ता. नेवासा) राम भगवान गव्हाणे (रा. गोपाळवस्ती ता. गेवराई) या पाच जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. या पाच जणांवर चोऱ्या, घरफोडया, जबरी चो-या, गंभीर दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्हेगारांनी जिल्हाभर आणि इतर जिल्ह्यात ही अनेक गुन्हे केले आहेत.त्यामुळे बीड जिल्हयातुन तसेच अंबड तालुका, पैठण तालुका, शेवगाव, नेवासा, पाथर्डी तालुक्याचे कार्यक्षेत्रातुन महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे एक वर्षे कालावधीसाठी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांनी हद्दपार केले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, बीड यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संतोष साबळे, पोलीस स्टेशन गेवराईचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, मोहन क्षीरसागर,राजु भिसे,पोलीस अंमलदार आलिम शेख, गणेश हांगे यांनी केलेली आहे.