बीड, दि.१२ (प्रतिनिधी)- बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेबाबत अफवा उठवली जात आहे. या अफवांवर विश्वास ठेवू नका, बीड जिल्ह्यातील ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित आहेत. ज्यांचा विश्वास नसेल ते आपल्या ठेवी कधीही घेवून जावू शकता. फक्त गर्दी करू नका आणि शिस्तीमध्ये घेवून जावा असे आवाहन ज्ञानराधा बँकेचे व्यवस्थापक यांनी केले आहे.
तिरूमला उद्योग समुहाच्या तपासणीसाठी आयकर विभागाचे काही अधिकारी तपासणी करत आहेत. त्या पार्श्वंभूमीवर ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेच्या बाबत बाहेर काही अफवा पसरविण्याचे काम सुरू आहे. आयकर विभागाच्या या तपासणी नियमित असतात. या तपासणीचा आणि उठवलेल्या अफवांचा संबंध लावून ठेवीदार आपल्या ठेवी काढून घेण्यासाठी आज दिवसभर मोठी गर्दी करत आहेत. तुमच्या ठेवी आहेत त्या काढून घेण्याचा अधिकार तुम्हाला आहे. आणि तुम्ही जेव्हा बँकेमध्ये काढून घेण्यासाठी येताल तेव्हा त्या ठेवी आपणास सन्मानाने परत मिळतील. कारण बँक सुस्थितीमध्ये आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, ठेवीदारांना एकच विनंती आहे आपल्या ठेवी काढून घेण्यासाठी गर्दी करू नका, शिस्तीमध्ये काढून घ्या आणि प्रशासनाला सहकार्य करा, आपल्या ठेवी काढून घेताना कोणतीही आडकाठी मध्ये येणार नाही हा विश्वास बँकेचे व्यवस्थापक हाडुळे यांनी दिला.