धारूर/ केज/ बीड,
धारूर आणि केजमध्ये चोरीच्या गाड्या असल्याची माहिती बीड एलसीबीचे प्रमुख संतोष साबळे यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी एक टीम पाठून धारूर आणि केज मधून काही दुचाकी जप्त केल्या आहेत.
एलसीबीने धारूरमधून चार व केजमधून चार गाड्या ताब्यात घेतल्या. ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, एलसीबीचे प्रमुख संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संजय तुपे, तुळसीराम जगताप, कैलास ठोंबरे, भागवत शेलार, अशोक दुबाले, नसीर शेख, राहुल शिंदे, बापू घोडके, गणेश मराडे यांनी केली.