धारूर, दि. 18 (लोकाशा न्यूज) : आवरगाव (ता.धारूर) येथे एक गाव एक गणपती या संकल्पनेतून दरवर्षी गणेश उत्साव साजरा केला जात आहे. याअनुषंगानेच याही वर्षी येथील मातृभुमी प्रतिष्ठाण सार्वजनिक गणेश मंडळाने आपली कार्यकरणी जाहिर केली आहे. यामध्ये अध्यक्षपदी पुन्हा प्रदिप सुखदेव नखाते यांची निवड करण्यात आली आहे. तसेच उपाध्यक्ष रोहन नखाते, सचिव हनुमंत तांबवे, कोषाध्यक्ष राहूल जगताप, देखरेख तुषार जगताप, सजावट अशोक नखाते, मिरवणूक प्रमुख नेताजी लोखंडे, सह सचिव अशोक नखाते, भंडारपाल म्हणून संदिप पांचाळ यांची निवड करण्यात आली आहे.