माजलगाव प्रतिनिधी दि.14
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व स्व.सुंदरराव सोळंके साहेब यांच्या जयंतीनिमित्त १७ संष्टेबर रोजी स.११ वा सुंदरराव सोळंके महाविद्यालय, माजलगाव येथे विद्यार्थी करिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आव्हान कानिफनाथ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सौ ऐश्वर्याताई सोळंके यांनी केले आहे.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व लोकनेते स्वर्गीय सुंदरराव सोळंके साहेब यांच्या जयतीनिमित्त आयोजित विद्यार्थी करिअर मार्गदर्शन शिबिराच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणुन परभणी येथील प्रा.श्री.विठ्ठल कांगणे सर (स्वामी विवेकानंद करिअर ॲकडमी परभणी ) यांचे मार्गदर्शक लाभणार आहे.तर कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून उपविभागीय अधिकारी सौ.निलम बाफना या उपस्थित राहणार आहेत.तर अध्यक्षस्थानी माजलगाव विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा.माजी जि.प सदस्या सौ.मंगलताई सोळंके या भूषवणार आहेत.या कार्यक्रमास जास्तीत जास्त विद्यार्थी-तरुण-शिक्षण प्रेमी यांनी उपस्थित रहावे असे आव्हान कार्यक्रमाच्या आयोजक सौ.ऐश्वर्या जयसिंग सोळंके यांनी केले आहे.