बीड (दि. 05) – राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा प्रशासनास दिलेल्या सूचनांप्रमाणे अग्रीम पिक विमा देण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. या कार्यवाहीस आता वेग आला असून सोयाबीन पिकाच्या आधी मंजूर केलेल्या 52 मंडळांसह अग्रीम पीक विमा देण्यासाठी आणखी 21 मंडळांचा समावेश करण्यात आला आहे.
एकूण 86 मंडळांपैकी 52 मंडळांमध्ये सर्वेक्षणाचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर अग्रीम पिक विमा मंजूर करण्याची अधिसूचना मागील आठवड्यात काढण्यात आली होती, त्यानंतर चार तारखेपर्यंत पूर्ण झालेल्या सर्वेक्षणाचे अहवाल तपासून जिल्हा प्रशासनाने आज जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आणखी 21 मंडळांमध्ये सोयाबीन या पिकाच्या अग्रीम पीक विम्यास मंजुरी दिली आहे.
आता 86 पैकी 73 मंडळांमध्ये सोयाबीन या पिकास अग्रीम पिक विमा मिळण्याचे निश्चित झाले असून उर्वरित 13 मंडळाचे सर्वेक्षण अजूनही सुरू आहे. हे सर्वेक्षण व कृषी विद्यापीठातील हवामान तज्ञ व कृषी विद्यावेत्ता यांना 13 मंडळांचा अहवाल व उपग्रहानुसारची माहीची (satellite data) अहवाल रविवार पर्यंत सादर करण्याचा सूचना आहेत, त्यानुसार सदर अहवाल रविवार पर्यंत येतील अशी अपेक्षा आहे. त्यानंतर पुढील सोमवारी उर्वरित 13 मंडळांचा समावेश करण्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. कापूस व तूर या दोन पिकांच्या अग्रीम बाबत देखील सोमवारच्या बैठकीत चर्चा होईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी दिली आहे.
या 21 मंडळांमधील अग्रीमला मान्यता
धारूर तालुका – धारूर, अंजनडोह, तेलगाव, मोहखेड
गेवराई तालुका – पाचेगाव, पाडळसिंगी, धोंडराई
परळी – परळी
केज – होळ, केज, चिंचोली माळी, हनुमंत पिं., मसाजोग, युसूफ वडगाव, बनसारोळा
पाटोदा – अमळनेर, कुसळंब, पाटोदा, थेरला, दासखेड,
वडवणी – चिंचवण