बीड

जलजीवनमध्ये अनियमितता करणार्‍या भेंडेकरांना सीईओंचा दणका,तडकाफडकी केले निलंबित, निलंबन काळात आष्टी पंचायत समितीत लावावी लागणार हजेरी




बीड, दि. 30 (लोकाशा न्यूज) : जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागातील कनिष्ठ साहाय्यक अजित भेंडेकरांना सीईओ अविनाश पाठक यांनी मोठा दणका दिला आहे. पाणी पुरवठ्ा विभागातील लेखा विभागात अनियमितता केल्याचा ठपका ठेवत पाठकांनी मंगळवारी रात्री भेंडेकरांना तडकाफडकी निलंबित केले आहे. या कारवाईमुळे बीड जिल्हा परिषदेमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी कनिष्ठ सहाय्यक अजित भेंडेकरांकडे लेखाविभागाची जबाबदारी सोपविली होती, मात्र मिळालेल्या जबाबदारीचे पालन त्यांनी चोखपणे बजावले नाही, जलजीवनच्या कामातील भ्रष्टाचारात त्यांच्यावर मोठा ठपका ठेवण्यात आला आहे. या दरम्यानच्या काळात लेखाविभागात अनियमितता करणे, अधिकार्‍यांची परवानगी न घेताच रजेवर जाणे, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे, विहीत वेळेत निवीदा पुर्ण न करणे यासह इतर कारणास्तव त्यांना सीईओंनी तडकाफडकी निलंबित केले आहे. सीईओंच्या या कारवाईमुळे बीड जिल्हा परिषदेमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान निलंबित काळात भेंडेकरांना आष्टी पंचायत समिती हे मुख्यालय देण्यात आले आहे. त्यानुसार आता त्यांना त्या ठिकाणी दररोज हजेरी लावावी लागणार आहे.

.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!