बीड, दि. 11 (लोकाशा न्यूज) : आपल्याला सर्वांना मिळून बीड जिल्ह्याला विकासात पुढे घेवून जाण्यासाठी गतीने काम करायचे आहे, त्यामुळे प्रत्येक काम क्वॉलीटीचे करा, अशा स्पष्ट सुचना सीईओ अविनाश पाठक यांनी आष्टी पंचायत समितीच्या अधिकारी आणि कर्मचार्यांना दिल्या आहेत. विशेष म्हणजे यापुर्वी त्यांनी आष्टी तालुक्यातील टाकळशिंगी या गावात जावून जलजीवनच्या कामाचीही पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा आष्टीचे बीडीओ श्री. मुंडे, पाणी पुरवठ्याचे कार्यकारी अभियंता श्री. धाबेकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
बीड जिल्हा परिषदेच्या सीईओ पदाचा पदभार घेवून अविनाश पाठक यांना चार दिवस झाली आहेत. रूजू होताच त्यांनी जिल्ह्यात गतीने कामाला सुरवात केली आहे. पहिल्या दिवशी त्यांनी जिल्ह्यातील पशुसंवर्धनासाठी मोठा प्लॅन तयार केलेला आहे. या फ्लॅननुसार ते गाव तिथे खोडा उभा करणार आहेत. तसेच झेडपीतील फिईलींची सिस्टीमही त्यांनी चेंज केली आहे, विशेष म्हणजे त्यांनी नायगाव आणि लिंबागणेश येथील अचाणक प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देवून त्या ठिकाणचा कुचकामी कारभारही उघडा केला आहे. शुक्रवारी त्यांनी आष्टी पंचायत समितीमध्ये जावून त्या ठिकाणच्या कामांचा आढावा घेतला, आपल्या सर्वांना बीड जिल्ह्याचा गतीने विकास करायचा आहे, त्यामुळे प्रत्येक काम क्वॉलीटीचे आणि ते गतीने करावे, प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत वेळच्या वेळेत पोहचवाव्यात, नागरिकांवर अन्याय होणार नाही याची काळजी पावलोपावली घ्यावी, जे चुका करतील त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, असे आदेश यावेळी सीईओंनी दिले आहेत. या बैठकीनंतर त्यांनी आष्टी तालुक्यातील टाकळशिंगी गावात जावून त्या ठिकाणच्या जलजीवनच्या कामाची पाहणी केली, यावेळी त्यांनी अधिकार्यांनाही काही सुचनाही दिल्या.