बीड

जिल्हाधिकाऱ्यांचा दणका,तिसर्‍या अपत्यामुळे वरपगावच्या महिला सरपंच अपात्र

केज – तिसरे अपत्य असताना सरपंच पदावर निवडून आलेल्या वरपगाव ( ता. केज ) येथील ग्रामपंचायतीच्या अनुसूचित जमातीच्या महिला सरपंच नीता दादाराव उर्फ दादासाहेब कांबळे यांना पदावरून अपात्र करण्यात येत असल्याचा निर्णय बीडच्या जिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे.

केज तालुक्यातील वरपगाव येथील ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी आरक्षित होते. डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निता दादाराव ऊर्फ दादासाहेब कांबळे या सरपंच पदावर जनतेतून निवडून आल्या होत्या. 

त्यांनी तिसरे अपत्य असताना निवडणूक लढवून त्या सरपंच झाल्या होत्या. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते डी. बी. बनसोडे यांनी त्यांच्या विरुद्ध आक्षेप दाखल करून त्यांना अपात्र घोषित करण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. त्यानुसार घेण्यात आलेल्या सुनावणीत उपलब्ध कागदपत्रे, अर्जदार व गैरअर्जदार यांच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर बीडच्या जिल्हाधिकार्‍यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलमामधील तरतुदीनुसार सरपंच नीता कांबळे यांनी तिसर्‍या अपत्याच्या नियमांचा भंग केल्यामुळे सामान्य सामान्य प्रशासन विभागाचे माधव काळे यांनी सरपंच पदावरून अपात्र करण्यात येत असल्याचा निकाल 24 जुलै रोजी दिला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!