दिल्ली, बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांबाबत काल केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांची त्यांच्या दिल्लीस्थित कार्यालयात खा. प्रीतम ताई मुंडे यांनी भेट घेतली.
लातूर जिल्ह्याच्या हद्दीपासून बीड जिल्ह्यातील लोखंडी सावरगाव दरम्यानचा महामार्ग चौपदरी करण्यात यावा, याकरिताचा प्रस्ताव रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वार्षिक नियोजनात समाविष्ट करून चौपदरीकरणाला मंजुरी देण्यात यावी ही मागणी यावेळी सादर केली.
तसेच तेलगाव-सिरसाळा ( राष्ट्रीय महामार्ग 361 F ) या वीस कि.मी रस्त्याचे पदपथासह चौपदरीकरण करण्यात यावे व वार्षिक योजनेत सदरील रस्त्याचा समावेश करून मंजुरी द्यावी ही मागणी केली.
तसेच धारूर तालुक्यातील घाटात असलेल्या अरुंद रस्त्याविषयी त्यांच्याशी चर्चा केली. धारूर घाटात राष्ट्रीय महामार्ग ( 548 C ) अरुंद असल्यामुळे येथे अपघात प्रवण क्षेत्र तयार झाले आहे, याठिकाणी रस्त्याचे रुंदीकरण करणे अत्यंत आवश्यक असल्याची बाब माननीय मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली. धारूरच्या घाटातील रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी राज्य रस्ते महामंडळाने सादर केलेल्या प्रस्तावास मंजुरी देण्याची विनंती ही केली आहे.
आपल्या जिल्ह्यातील लोकहिताच्या मागण्या सादर करण्यासाठी मा.नितीन गडकरी जी यांनी त्यांचा बहुमूल्य वेळ देऊन सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल मी त्यांचे खा. प्रीतम ताई मुंडे यांनी आभार व्यक्त केले.