बीड

पैशासाठी पत्नीचा खुन करणाऱ्या पतीस जन्मठेप

चौथे अति सत्र न्यायाधीश श्री आर. एस. पाटील साहेब यांचा निकाल


बीड प्रतिनिधी
बीड येथील चौथे अति जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. आर. एस. पाटील साहेब यांनी पत्नीचा पैशासाठी छळ करून तिचा खून केल्याच्या गुन्हयात आरोपी शिवाजी महादेव फाटक रा. जेवापिंप्री ता.जि. बीड याला दोषी धरून त्याला जन्मठेपेची शिक्षा बुधवार दि. 12 जुलै 2023 रोजी
सुनावली. प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकिल अँड. मंजुषा दराडे यांनी बाजू मांडली.
या प्रकरणाची चोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 25.10.2002 रोजी प्रभा रमेश बोरकर रा. मुंबई हयांनी नेकनुर पो स्टे ला समक्ष हजर होऊन फिर्याद दिली की, त्यांची मोठी मुलगी सुरेखा हीचा विवाह जेबापिंप्री येथील शिवाजी फाटक यांचे बरोबर झाला होता. लग्नानंतर तिला सासरच्या मंडळींनी 15 दिवस चांगले नांदवले व नंतर तिला नवरा शिवाजी महादेव फाटक, सासरा महादेव चांगदेव फाटक, सासु द्वारकाबाई महादेव फाटक, नणंद सिमा यांनी टेलरींग चे दुकान टाकण्यासाठी माहेरहून रु. 50,000/- पेउन ये म्हणून छळ करण्यास सुरवात केली त्यानंतर दिनांक 25.10.2002 रोजी शिवाजी फाटक याने मुलगी सुरेखा हिने माहेरवरून 50,000/- आणले नाहीत म्हणुन दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास गुप्तीने छातीवर वार करून तिचा खुन केला आहे. अशा आशयाची फिर्याद दिल्यावरून आरोपी शिवाजी फाटक व इतर यांचेवर कलम 498 (अ) 302,34. भादवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्हयाचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक एम. आर. गरुड यांनी करून आरोपी विरुद्ध बीड येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. गुन्हा करून आरोपी फरार होता. तो मिळुन आले नंतर तपासी अधिकारी बी. बी. जाधव यांनी पुरवणी दोषारोप पत्र दाखल केले होते. सरकारपक्षातर्फे प्रकरणात एकुण 12 साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाने सादर केलेल्या पुराव्या आधारे व सहा सरकारी वकिल मंजुषा दराडे यांनी केलेल्या युक्तीवादामुळे बीड येथील चौथे अति, जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. आर. एस. पाटील साहेब यांनी आरोपी शिवाजी महादेव फाटक यास कलम 498 (अ) व 302 मध्ये दोषी स्वास 498 (अ) मध्ये 3 वर्ष शिक्षा व 5000 दंड तसेच कलम 302 भादवी मधे जन्मठेप व 10,000 ची शिक्षा सुनावली तसेच दंड न भरल्यास एक वर्ष साध्या कैदेची शिक्षा सुनावली.
प्रकरणात सरकार पक्षातर्फे महा सरकारी वकिल अँड मंजुषा एम. दराडे यांनी बाजू मांडली. त्यांना सरकारी वकील बी. एस. राव,अंड अजय तांदळे यांनी सहकार्य केले. पैरवी अधिकारी म्हणून श्री परमेश्वर सानप, एम.बी. पी. एस आय श्री जायभाये यानी काम पाहिले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!