अंबाजोगाई बीड

कोरोना वार्डात कर्तव्य बजावताना एका कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

अंबाजोगाईतील स्वाराती रुग्णालयातील घटना

बीड दि.12: महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले असून दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत आहे. बीड जिल्ह्यात दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असलेल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. कोरोना वार्डात कर्तव्य बजावताना एका कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने जिल्हावासीयांच्या चिंतेत भर पडली आहे.
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कोरोना कक्षात कर्तव्य बजावण्यासाठी रात्रपाळीच्या ड्युटीवर गेलेले कर्मचारी नितीन माने यांचा रुग्णालयात अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रुग्णालयातील औषध, गोळ्या विभागातील ओपीडी क्रमांक ८ मध्ये काम करणार्‍या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याची कोरोना कक्षात ७ दिवसासाठी काल तात्पुरती नियुक्ती करण्यात आली होती. पहिल्या दिवशी त्यांना रात्रपाळीसाठी कर्तव्य बजावण्यासाठी येण्याचे तोंडी आदेश तेथील अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार नितीन माने हे रात्री ८ वाजता तेथे कर्तव्य बजावण्यासाठी रुजू झाले असता रात्री १२ वाजेच्या सुमारास तेथे कर्तव्यावर असलेल्या नर्सला नितीन माने हे जमिनीवर पडलेले दिसले. तेथील नर्स यांनी तातडीने त्यांना अपघात विभागास सदरील माहिती दिली. नितीन माने यांना तात्काळ पुढील उपचारासाठी अपघात विभागात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी माने यांना तपासले ते मयत झाल्याचे घोषित केले. माने यांच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. माने यांचे शवविच्छेदन केल्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!