बीड

तळेगावच्या आदर्श मतदान केंद्राने वेधले लक्ष

आकर्षक सजावटीपासून मतदारांना मिळाल्या विविध सुविधा, केंद्रावर सर्व महिलाची नियुक्ती



बीड, दि.18 (लोकाशा न्युज) ः तालुक्यातील तळेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आदर्श मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते. त्या ठिकाणी ज्येष्ठांना बसण्याची बाकडे, पाणी पिण्याची सुविधा व मतदारांना बसण्यासाठी मंडप टाकला होता. विशेष म्हणजे, तळेगावच्या मतदान केंद्रावर केंद्रध्यक्षापासून ते मतदान अधिकार्‍यांपर्यंत सर्व महिलाची नियुक्ती करण्यात आली होती.
तळेगावच्या आदर्श मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती तर मंडपाला फुगे लावण्यात आले होते. तसेच मतदान जनजागृती करणारे स्टँडी उभे केले होते. आतमध्येही जागोजागी तिरंगी फुगे भिंतीवर लावली होती. मतदारांनी मतदान करुन आल्यानंतर फोटो काढण्यासाठी सेल्फी पाँईट ही उभारण्यात आला होता. दरम्यान, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी रविवारी सकाळी तळेगाव केंद्राला भेट देऊन पहाणी केली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, उपजिल्हाधिकारी डॉ. दयानंद जगताप यांनी ही भेट दिली. यावेळी त्यांच्या सोबत बीडीओ अनिरुद्ध सानप, अव्वल कारकुन महादेव चौरे, महसूल सहायक सुरज मुळे यांची उपस्थिती होती. सर्वांनी बीड तहसिलदार व त्यांच्या टिमचे याबद्दल स्वागत केले. ज्येष्ठांना बसण्याची बाकडे, पाणी पिण्याची सुविधा व मतदारांना बसण्यासाठी मंडप टाकला होता. अशा प्रकारे आदर्श मतदान केंद्र सर्वच ठिकाणी असले पाहिजेत असे मत यावेळी सर्वांनीच व्यक्त केले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!