बीड, दि.24 (प्रतिनिधी)ः-पर्यावणाचा समतोल राखण्यासाठी व जागतिक तापमानवाढ यासारखे अनेक संभाव्य धोके टाळण्यासाठी वृक्षारोपण हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे श्री कल्पतरू संस्थान जयपूर, के.पी.एम.जी., मित्र फाउंडेशन वपरिसरातील वृक्ष प्रेमी एकत्र येत येणार्या पुढील काळात जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यासाठी एक मोहिम हाती घेतलि असून त्याचे उद्घाटन ढेकणमोहा येथिल पसायदान सेवा प्रकल्पामध्ये ट्रि मॅन ऑफ इंडिया असलेले विष्णु लांबा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, मुख्यकार्यकारी अधिकारी अजित पवार व विभागीय वन अधिकारी सचिन कंद यांची उपस्थितीत संपन्न होणार आहे.
वृक्षवल्ली आम्हां सोयरे म्हणजे वृक्ष आपले मित्र. वृक्षसंपदा नाही तर जीवन सुद्धा नाही. मानवाची सेवा करण्यात निसर्गाचा फार मोठा सहभाग आहे. बीड जिल्ह्यामध्ये दरवर्षी पावसाळ्यामध्ये पडत असलेल्या कमी पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती होत उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. या सर्व परिस्थितीतून जिल्ह्याला बाहेर काढण्यासाठी वृक्षारोपन करणे काळाजी गरज असल्याने जिल्ह्यातील विविध वृक्षप्रेमी संस्था एकत्र येत वृक्षारोपन मोहिम उभी करण्यात आली आहे. या मोहिमेचे शनिवार दि.26 मार्च रोजी सकाळी 9:30 वाजता स्थळ पसायदान सेवा प्रकल्प लक्ष्मण नगर, ढेकणमोहा तांडा येथे विष्णु लांबा (ट्रि मॅन ऑफ इंडिया, श्री कल्पतरू संस्थान जयपूर), जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, मुख्यकार्यकारी अधिकारी अजित पवार, विभागीय वन अधिकारी सचिन कंद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असून यावेळी जिल्हा कृषी अधिकारी बी.के.जेजूरकर, कृषी विकास अधिकारी सुभाष साळवे, तहसिलदार मंजुषा लटपटे, संपादक गंमत भंडारी, कार्यकारी संपादक गणेश सावंत, गोविंद शेळके, संपादक जालिंदर धांडे, उपसंपादक नितीन चव्हाण, गटविकास अधिकारी अनिरूद्ध सानप,तालुका कृषी अधिकारी बी.आर.गंडे, सचिव सोमनाथ बडे,डॉ. अनिल सानप, वनपाल दिनेश मोरे, रश्मी गोसावी, अजय देवगुडे, अरूण पवार, गोवर्धन दारडे, सुरेश पवार, दिलीप आडे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित राहणार असून तरी या मोहिमेच्या उद्घाटनास जिल्ह्यात वृक्षमित्र, वृक्षपे्रमी यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन किरण राठोड बिभीषण राठोड, बिपीण डरपे, कृष्णा राठोड यांसह कल्पतरू संस्थान जयपूर, के.पी.एम.जी., मित्र फाउंडेशन व परिसरातील वृक्ष प्रेमी यांनी केले आहे.