बीड, दि. 4 (लोकाशा न्यूज) : जिल्ह्यातील वाघलूज शिवारातील एका हॉटेलवर धाड टाकून त्याठिकाणी सुरू असलेला जुगार अड्डा उद्वस्त करण्यात आला आहे, तसेच याठिकाणी आठरा जुगार्यांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडले आहे. यावेळी आडीच लाख रूपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आयपीएस पंकज कुमावत आणि रस्मीता राव यांच्या पथकाने केली आहे. याबाबत बालाजी दराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 18 जुगार्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक राजा रामा स्वामी यांना माहिती मिळाली की कडा ते अहमदनगर जाणारे रोडवर वाघलूज शिवारात हॉटेल साई भक्तीमध्ये इसम नामे अशोक एकनाथ खकाळ स्वतःच्या फायद्याकरिता काही लोकांना एकत्र बसून जन्ना मन्ना पत्त्याच्या जुगारावर पैसे लावून जन्ना मन्ना नावाचा जुगार खेळ खेळतो खेळवीत आहे अशी माहिती मिळाली होती, सदरची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावात यांना कळविल्याने सहा पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत यांनी मा. पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक रश्मीता राव व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पोलीस अंमलदार यांना पंचासह सदर बातमीचे ठिकाणी पाठवून पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन दिं. 4 मार्च 2022 रोजी 16.30 वाजता छापा मारला असता सदर ठिकाणी 18 इसम गोलाकार आकारात बसून जन्ना मन्ना नावाचा पत्त्याचा जुगार खेळताना जागीच मिळून मिळून आला, त्याचे ताब्यात नदीत 48430 रुपये व जुगाराचे साहित्य व चार मो.सा किमती 195000 व सदर हॉटेलची झडती घेता हॉटेलमध्ये देशी-विदेशी 9878 रुपये असा एकूण 253308 रुपयाचा मिळून आल्याने जप्त करून एकूण 18 आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे आंबोरा येते बालाजी दराडे यांचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक, मा. अप्पर पोलीस अधीक्षक, सहाय्यक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक रस्मीता राव, उपविभागीय कार्यालय केज येथील पोलीस आमदार बालाजी दराडे राजू वंजारे दिलीप गीते संजय टूले महादेव बहिरवल सखाराम घोलप अविनाश घुंगट यांनी केली आहे.