केज:- राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तन आयोजित करून जिल्हाधिकारी यांचा आदेश डावलून जमाव जमा केल्या प्रकरणी मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी दि.१७ जानेवारी रोजी राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त रोजी केज तालुक्यातील नांदुरघाट येथे प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे किर्तनाचा कार्यक्रमाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी सुमंत धस यांनी दि. १६ जानेवारी रोजी परवानगी मागितली होती. परंतु जिल्ह्यात कोरोनाच्या पर्सग्वाभूमीवर जमावबंदी व संचार बंदी असल्यामुळे त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरिक्षक शंकर वाघमोडे यांनी त्यांना कार्यक्रम घेण्यात येऊ नये. असे पोलीस जमादार मेसे यांनी त्यांचे सहकारी भालेराव व शेख यांना सोबत घेऊन त्यांना नोटीसीद्वारे कळविले होते. जिल्ह्यामध्ये साथरोग नियंत्रण कायद्यानुसार जिल्हाधिकारी बीड यांनी जमावबंदीचा व रात्री संचार बंदीचा आदेश जारी केलेला असतानाही आयोजक मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून नांदुरघाट येथे निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तनाच्या ठिकाणी एक हजार ते बाराशे लोकांचा जमाव जमा केला. म्हणून केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशावरून पोलिस जमादार मेसे यांच्या फिर्यादीवरून मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु.र.नं. १०/२०२२ भा.दं.वि. १८८, २६९, २७० १७ ५१(ब) गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार मेसे हे पुढील तपास करीत आहेत.