बीड

वारंवार निवेदन देऊनही न.प. कडून नागरी सुविधांकडे दुर्लक्ष; एमआयएमने रेड्यासमोर पुंगाण्या वाजवून केले अनोखे आंदोलन

बीड:- ज्या पद्धतीने रेड्यासमोर कितीही पुंग्या वाजविल्या तरी त्याला फरक पडत नाही, तसे बीड पालिकेचे झाले असल्याचा गंभीर आरोप एमआयएमने केला. नागरी समस्यांनी बीडकर हैराण असतानाही पालिका दुर्लक्ष करत आहे, याचा निषेध म्हणून पालिकेसमोर मोर्चात रेडा आणून त्याच्यासमोर पुंगाण्या वाजविण्यात आल्या.
बीड शहरातील नागरी समस्यांवर सोमवारी एमआयएमच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शहरात पाच दिवसांआड पाणीपुरवठा करावा, रस्ते व नाल्यांची रखडलेले कामे तत्काळ पुर्ण करावित, शहरात विषेश स्वच्छता अभियान राबवावे, अमृत अटल पाणी योजनेचे काम तत्काळ पुर्ण करावे, कामासाठी खोदलेले रस्ते दुरुस्त करावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत मात्र वारंवार निवेदन करूनही नागरी सुविधा मिळत नसल्याने एमआयएमच्या वतीने नगर समोर रेडा आनून त्याच्या समोर पुंगाण्या वाजविन्या वाजून आंदोलन करण्यात आले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!