बीड:- परळी येथील थर्मलमध्ये टेक्निशियन पदावर कार्यरत असलेल्या पापालाल प्रभू चव्हाण हे ड्युटी संपल्यानंतर दुचाकीवरून घरी जातांना शुक्रवारी सायंकाळी परळी येथील इटको कॉर्नर जवळी पुलावर अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने गंभीर जखमी झाले होते. यात उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी निधन झाल्याचे घोषित केले.
प्रत्येक माणसास मृत्यू हे अंतिम सत्य आहे. मात्र ऐन तारुण्यात व उमेदीच्या काळात अकाली मृत्यु येणे ही फार दुःखदायक व मनाला चटका लावून जाणारी अशी घटना आहे. हलाकीच्या जीवनातून आपले अस्तित्व निर्माण करत नावलौकिक केले. परंतु नियतीने दिला. आपले दैनंदिन काम आटपून सायंकाळी घरी जातांना अज्ञात वाहनाकडून जोराची धडक देण्यात आली. यात पापालाल चव्हाण यांच्या डोक्याला आणि पायाला मोठ्या प्रमाणात मार लागल्याने अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र येथील डॉक्टर यांनी मयत झाल्याचे घोषित केले. त्यांच्या अकाली जाण्याने आणि घरातील कर्ता पुरुष गेल्याने चव्हाण कुटूंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, एक मुलगी असा परिवार असून त्यांच्या पार्थिवावर शनिवार दि.16 ऑक्टोबर रोजी जायकोवाडी तांडा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या दुःखात लोकाशा परिवार सहभागी आहे.