बीड:- केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता 5 वी ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार तांदूळ, चनादाळ, खिचडी इत्यादी पोषक आहार वाटप केला जातो. तांदळाची खिचडी विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवनात दिली जाते. नुकतेच यामध्ये शालेय शिक्षण विभागाने बदल केला असून विद्यार्थ्यांना विविध धान्यापासून बनवलेले बिस्कीटे देण्यात येत आहेत. बीड जिल्ह्यातही गेल्या चार दिवसापासून या बिस्कीटाचे वाटप शाळेमध्ये विद्यार्थ्यांना करण्यात येत आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने जालना येथील एका खासगी कंपनीला याचे टेंडर दिलेले आहे. बीड जिल्हा शिक्षण विभागाकडून एकूण शाळांची संख्या आणि विद्यार्थ्यांची संख्या मागवल्यानंतर या कंपनीकडून बीड जिल्ह्यातील ज्या शाळा सुरू झालेल्या आहेत त्या शाळेतील विद्यार्थ्यांना या कंपनीकडून गेल्या चार दिवसापासून या बिस्कीटाचे वाटप करणे सुरू आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी, मुग, इतर कडधान्य यापासून ही बिस्कीटे ती कंपनी बनवते आणि प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या धान्याचे बिस्कीटे या शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येतात. बीड जिल्ह्यातही गेल्या चार दिवसापासून या बिस्कीटाचे वाटप करण्यात येत आहे. इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना बिस्कीटे वाटप करतांना बिस्कीटाचे तीन पुडे तर इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना या बिस्कीटीचे आठ पुडे दिले जातात. या बिस्कीटाची चव चांगली की वाईट? याबाबत मात्र अद्यापपर्यंत कोणत्याही प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून आलेल्या नाहीत. ही कंपनी शिक्षण विभागाने दिलेल्या यादीप्रमाणे स्वत:च वितरणाची सोय बघून या बिस्कीटाचे वाटप करण्यात येत आहे. मात्र आत्तापर्यंत बीड जिल्ह्यामध्ये किती विद्यार्थ्यांना, किती शाळेत या बिस्कीटाचे वाटप झाले? याची माहिती शिक्षण विभागाला नाही.