बीड – बीड विधानसभा मतदार संघाचे आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांना वाढदिवसानिमित्त अनेकांनी शुभेच्छा आणि ज्येष्ठांनी आशीर्वाद दिल्यानंतर आ.संदीप क्षीरसागरांनी ‘तुमचे आशीर्वाद असेच राहू द्या,या जन्मी तरी ऋणातून मुक्त होणे अशक्य’ असल्याची भावना व्यक्त करत बीड मतदार संघाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. नवगण राजुरी येथील ग्रामदैवत नवगण गणपतीचे, धाकटी पंढरी असलेल्या श्री क्षेत्र नारायणगड येथे नगद नारायणाच्या समाधीचे, कंकालेश्वर मंदिरात महादेवाचे दर्शन घेवून शहेंशाहवली दर्गाह येथे आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी चादर चढवली. बीड शहरात व ग्रामीण भागात त्यांचे विविध ठिकाणी औक्षण करण्यात आले.
शुक्रवार दि.27 ऑगस्ट रोजी सकाळी आ.संदीप क्षीरसागर यांनी सर्वप्रथम नवगण राजुरी येथील गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी गावातील महिलांनी औक्षण केले. आपल्या जन्मगावचे प्रेम, आशीर्वाद घेत आ.संदीप क्षीरसागर धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या नारायण-गडावर गेले. नारायणगडचे आशीर्वाद घेतले. यावेळी मठाधिपती शिवाजी महाराज यांचे आशिर्वाद घेतले त्यानंतर शहेंशाहवली दर्गाह येथे आ.संदीप क्षीरसागरांनी जावून चादर चढविली, कंकालेश्वरचे दर्शन घेत संत भगवानबाबांच्या चरणी नतमस्तक होत आ.क्षीरसागरांनी मोमीनपुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ओपीडी, आयपीडी व प्रसुतीगृहाच्या सुसज्ज रुग्णालयाचे उद्घाटन केले. यामुळे या भागातील रुग्णांना व महिलांना प्रसूतीसाठी इतर ठिकाणी जाण्याची गरज नाही. यावेळी आ.क्षीरसागरांनी काल सकाळपासून मतदारसंघातले मतदार मायबाप आवर्जून फोन करून शुभेच्छा देत आहेत, आशीर्वाद देत आहेत, तुमचे आशीर्वाद असेच राहू द्या, या जन्मी तरी तुमच्या ऋणातून मुक्त होणे अशक्य असल्याचे सांगत मतदार संघाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत विकास नेण्यासाठी, गावागावातल्या योजना राबविण्यासाठी आपण सातत्याने सरकार दरबारी प्रयत्नशील असून पक्षही आपल्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे. अनेक मोठमोठे कामे वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहेत. यापुढेही असेच विकास कामे होत राहतील. हे सर्व तुम्हा सर्वांच्या प्रेम आशीर्वादाच्या बळावरच होत असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या समवेत माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महादेव उबाळे, शहराध्यक्ष बाळासाहेब गुजर, मदन जाधव, डॉ.बाबू जोगदंड, जीवन जोगदंड यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट
काकू-नानांच्या प्रतिमेचे घेतले दर्शन
माझ्या जीवनाला ज्यांच्या महान कार्यामुळे समाज कारणाची दिशा मिळाली त्या आदरणी स्व.काकू-नानांच्या प्रतिमेचे आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी दर्शन घेतल्यानंतर जिल्हा परिषद सदस्या आई रेखाताई क्षीरसागर यांनी व कुुटुंबियांनी त्यांचे औक्षण केले. त्यानंतर आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांचा छोटेखानी कौटुंबीक वाढदिवसही साजरा करण्यात आला.
चौकट
भगवान बाबांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन
वारकरी संप्रादयातील महान तपस्वी वै.ह.भ.प.राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जयंती निमित्त बाबांच्या पावन स्मृतीस आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी विनम्र अभिवादन केले. यावेळी त्यांच्या समवेत माजी आ.सुनिल धांडे, सय्यद सलीम, महादेव उबाळे, अशोक वाघमारे, सचिन शेळके आदी जण उपस्थित होते.
चौकट
सामाजिक उपक्रमांनी आ.संदिप भैय्या क्षीरसागरांचा वाढदिवस साजरा
आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्ताने बीड मतदार संघातील विविध गावामध्ये खेड्यापाड्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, गरजुवंतांना मदतीचे वाटप अशा विविध सामाजिक, उपक्रमांनी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.