बीड राजकारण

“मी स्वत: अडचणीत आहे तर मंत्र्यांच्या अडचणीचं काय विचारता?” प्रताप सरनाईकांच्या विधानाने खळबळ

मीच स्वतः अडचणीत आहे त्यामुळे दुसऱ्यांच्या अडचणीबाबत मला काय विचारता असं वक्तव्य शिवसेनेचे ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केल्याने ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. कारण हे तेच शिवसेनेचे आमदार आहेत ज्यांनी शिवसेनेने भाजपशी जुळवून घ्या नाही तर शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर मंत्र्यांवर गुन्हे दाखल होतील, केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागेल असं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं होतं. त्यानंतर आता तर आपण किती अडचणीत आहोत याबाबत जाहीरपणे वक्तव्य करून प्रताप सरनाईक किती अडचणीत आहेत ते पुन्हा एकदा समोर आलंय.
ठाण्यामध्ये संस्कृती युवा प्रतिष्ठान दरवर्षी मोठ्या प्रमाणात दहीहंडीचे आयोजन करतात. मात्र यंदा करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता दहीहंडी उत्सवावर अनेक निर्बंध आणले आहेत. यामुळे यंदाही दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करता येणार नाही. हे लक्षात घेऊन संस्कृती युवा प्रतिष्ठानने दहीहंडी उत्सवा करता करत असलेला लाखो रुपयांचा खर्च शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या ओवळा माजिवडा या मतदार संघामध्ये आरोग्य सुविधा देण्याकरता वापरणार असल्याचे जाहीर केले होते. याच पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधांचा लोकार्पण कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमा दरम्यान आमदार प्रताप सरनाईक यांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बाबत प्रश्न विचारला असता त्यांनी आपण नारायण राणे त्यांच्यावर भाष्य करण्या इतपत मी मोठा नाहीये अशी प्रतिक्रिया आमदार प्रताप सरनाईक यांनी दिलीये.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!