बीड, दि.25 (लोकाशा न्यूज) : बीड जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यांत ई-पिक पाहणी प्रकल्प राबविण्यास शासनाने यापुर्वीच मान्यता दिली आहे. मोबाईल पवर ई-पिक पाहणी अॅप उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे, त्यामध्ये बीड जिल्हयाचा समावेश आलेला आहे. आपण त्वरीत प्लेस्टोअरवर जावून आपल्या मोबाईल मध्ये नविन ई-पिक पाहणी अॅप डाऊनलोड करावे व पुर्वीचे जुने प डिलिट करावे.आपणास ई-पिक पाहणीचे तलाठी व कृषी सहाय्यक यांचेमार्फत गाववार प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ज्यामध्ये आपला सहभाग मोलाचा आहे. गावातील सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, कोतवाल, धान्य दुकानदार, तंटामुक्ती अध्यक्ष, बचत गट प्रतिनिधी, अध्यक्ष, सहकारी सचिव, शेतकरी उत्पादक संघ अध्यक्ष, माविम संयोगिणी, पाणी फाउंडेशन गट, पोकरा प्रतिनिधी, ग्रामरोजगार सेवक, तांत्रिक सहाय्यक, बॅक प्रतिनिधी, शाळा व कॉलेज विदयार्थी, प्रगतीशिल शेतकरी, डॉक्टर्स, सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य, मिडीया प्रतिनिधी, आपले सरकार सेवा केंद्र इ. प्रशिक्षणात सहभागी व्हावे. ई-पिक पाहणी सर्वानी व्हॉटसअप असल्यास ग्रुपच्या माध्यमातून ई-पिक पाहणी अॅपच्या संबंधी माहिती घ्यावी. यापुढे ई-पिक पाहणी काम शेतकर्यांना स्वत:च ई-पिक पाहणी अॅपच्या माध्यमातून करता येणार आहे. ज्यामुळे शेतकर्यांना तलाठयांना शोधण्याची गरज भासणार नाही. ई-पिक पाहणी सोबतच ईतरही विविध नोंदी शेतकर्यांना करता येणार असल्यामुळे पिक विमा, पिक कर्ज, शासकीय मदत ई. विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी मदत होणार आहे. आपले संबंधित तालुका वाईज हेल्पडेस्कच्या माध्यमातून सकाळी 08.00 ते सायं. 06.00 वाजेपर्यत ई-पिक पाहणी संबंधित शंका व अडचणी असल्यास मोबाईल क्रमांकावर विचारुन त्यांचे आपणास निरसन करता येणार आहे, उपरोक्त ई-पिक पाहणी उपक्रमामध्ये समाजाच्या विविध घटकांनी भाग घ्यावा. व्हॉटस अॅप ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी यांनी ई-पिक पाहणी कामी योगदान द्यावे, असे अवाहन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केले आहे.