बीड, दि.17 (लोकाशा न्युज)ः- माजलगाव तालुक्यातील जीवनापूर नाथनगर तांडा येथील श्री शंकर राठोड यांच्या पत्नी सौ. कासाबाई शंकर राठोड (वय-58वर्षे) यांचे राहत्या घरी आजाराने गुरूवार दि.19 ऑगस्ट रोजी दुपारी 2.30 मिनिटांनी निधन झाले.
उमेदीच्या काळात अकाली मृत्यु येणे ही फार दुःखदायक व मनाला चटका लावून जाणारी अशी घटना आहे. नियतीने आणि शरिराने दगा दिल्याने दीर्घ आजार जडले. आजाराशी झुंज चालू असतांना गुरूवारी दि.19 ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजात राहत्याघरी प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात पती शंकर राठोड, मुलगा सुनिल शंकर राठोड, सचिन शंकर राठोड अनिल शंकर राठोड असे तीन मुले असून सुना, नातंवडे असा मोठा परिवार आहे. मनमिळाऊ स्वाभावाच्या माऊली हरविल्याने राठोड कुटूंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. त्यांच्या दुःखात चव्हाण परिवारासह दैनिक लोकाशा परिवार सहभागी आहे.