गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. आज आरोग्य विभागाला 4 हजार 822 संशयितांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 4 हजार 610 जण निगेटिव्ह तर 212 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
आजच्या अहवालात आलेल्या पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई 5, आष्टी 52, बीड 49, धारूर 6, गेवराई 13, केज 6, माजलगाव 19, परळी 2, पाटोदा 18, शिरूर 19 आणि वडवणी तालुक्यात 23 रुग्ण आढळून आले आहेत.