बीड

मुंडे भगिणींच्या आवाजामुळे ऊसतोड कामगार एक एक लढाई जिंकू लागले, अखेर चकलांबा येथील ‘त्या’ कामगाराच्या कुटूंबियांना मिळाले सव्वा दोन लाख, आणखी 19 जणांना मिळणार न्याय


बीड, दि. 3 (लोकाशा न्यूज) : लोकनेत्या पंकजाताई ह्या ऊसतोड कामगारांच्या नेत्या आहेत. त्यांनी बीडसह संपूर्ण राज्यातील ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने महामंडळ सुरू केले. ते महामंडळ भविष्यात कामगारांचे कल्याणच करणार आहे. ताई जरी आज सत्तेत नसल्यातरी त्या आणि खा. प्रीतमताई ऊसतोड कामगारांच्या प्रश्‍नांसाठी आपल्या जीवाचे राण करत आहेत. मुंडे भगिणींच्या आवाजामुळेच कामगार अन्यायाविरोधातील (कारखान्याविरोधातील) एक एक लढाई जिंकू लागले आहेत. चकलांबा येथील एका मयत ऊसतोड कामगाराच्या कुटूंबियांना नुकतीच सव्वा दोन लाख रूपयांची मदत मिळाली आहे, मुंडे भगिणींच्या आदेशाने सदर कामगाराच्या कुटूंबियांच्या मदतीला कृष्णा तिडके हे धावून गेले होते, त्यामुळेच सदर कामगाराला सव्वा दोन लाख रूपयांची मदत मिळाली आहे, दरम्यान ताईंच्या आदेशामुळेच आणखी 19 कामगारांसाठी लढाई सुरू आहे. त्यांनाही लवकरच न्याय मिळेल, असा विश्‍वास तिडके यांनी व्यक्त केला आहे.
गळीत हंगाम 2020-2021 मध्ये मयत झालेल्या एकुण 20 ऊसतोड कामगारांचे आपील ऊसतोड कामगारांच्या नेत्या पंकजताई मुंडे आणि खा. प्रीतमताई मुंडे यांच्या आदेशवरून कोर्टात दाखल केलेले आहे. त्या पैकी पहिला सव्वा दोन लाख रूपयांचा चेक मंजूर झाला आहे. तो चेक मयत ऊसतोड कामगार आदिनाथ सोनवणे (रा चकलांबा ता. गेवराई) यांच्या वारस पत्नी पार्वती आदिनाथ सोनवणे, मुलगा विवेक, मुलगी शितल आदिनाथ सोनवणे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला आहे. सदर कामगारच्या कुटूंबियाला सहा लाख रूपये मिळण्याची शक्यता आहे. त्यापैकी कोर्टात पहिली लढाई जिंकली असून सव्वा दोन लाख रूपये मिळाले आहेत. या संपुर्ण प्रक्रियेत लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब ऊसतोड मजूर संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष कृष्णा तिडके, रवीदादा खेडकर, भागवत खेडकर,सतीश खेडकर, बाळू सोनवणे यांनी कामगारांना वेळोवेळी सहकार्य केलेले आहे. दरम्यान मुंडे भगिणींचा आवाज प्रत्येक कामगाराला खर्‍या अर्थाने न्याय मिळवून देत असल्याचे यावरून स्पष्टपणे दिसून येत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!