धारूर, दि.2 (लोकाशा न्यूज) : सैन्य दलातील सैनिकाच्या विवाहित पत्नीने पतीसह सासू, सासरा व इतर नातलगांनी पैशाची मागणी करत शारीरिक व मानसिक त्रास दिल्याचा फिर्याद धारुर पोलिसात दिली आहे. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरुन धारुर पोलिस ठाण्यात सैन्य दलात कार्यरत सैनिकासह सहा जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, तालुक्यातील धुनकवाड येथील मुळ रहिवासी असलेल्या व सध्या धारुर शहरात लक्ष्मी नगर भागात राहत असलेल्या सुवर्णा भ्र. पांडूरंग यादव या 34 वर्षीय विवाहितेचा चार वर्षापूर्वी 2017 मध्ये पांडूरंग श्रीराम यादव यांच्याशी विवाह झाला होता. विवाह झाल्यापासून मार्च 2021 पर्यंत सतत घर बांधणीसाठी आई वडीलांकडून पाच लाख रुपये आण म्हणत शारीरिक व मानसिक त्रास देत उपोशी पोटी ठेवले. याकाळात सतत जाच जुलूम करुन वेळोवेळी लाथाबुक्क्यांनी, चापटाने मारहाण करुन मुकामार दिला. अर्वाच्च भाषेत शिविगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून धारुर पोलिस ठाण्यात कलम 498(अ), 323, 504, 506,34 भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीत पती पांडूरंग श्रीराम यादव या सैनिकासह व्यंकटी श्रीराम यादव (दीर), श्रीराम गणपती यादव (सासरा), सावित्रा श्रीराम यादव (सासू) सर्व रा.धुनकवाड नं.1, मंदाकिनी नामदेव साळूंके (नणंद), नामदेव बाबुशा साळूंके (नंदावा) दोन्ही रा. नाथापूर ह. मु. बीड यांचा समावेश आहे. सदरील गुन्ह्यातील आरोपी पती हा सैन्य दलात कार्यरत आहे. गुन्हाचा तपास हेड कॉन्स्टेबल शिवाजी चव्हाण करत आहेत. अशी माहिती पोलिस ठाणे प्रभारी सहाय्यक पोलिस निरिक्षक सुरेखा धस यांनी दिली.