बीड

‘मराठा क्रांती भवन’ मराठा समाजासाठी सुवर्णपान,माजीमंत्री क्षीरसागर यांच्या हस्ते 1 ऑगस्टला भूखंड हस्तांतरण सोहळा,नगराध्यक्ष डॉ क्षीरसागर यांनी केली शब्दपूर्ती

बीड (प्रतिनिधी) : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत असलेला बीड येथील ‘मराठा क्रांती भवन’ चा प्रश्न मार्गी लागला असून माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते भूखंड हस्तांतरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी समाजातील संपूर्ण समाजबांधवांनी उद्या 1 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता राजमाता जिजाऊ उद्यानच्या बाजूला राजीव गांधी चौक येथे उपस्थित रहावे असे आवाहन सकल मराठा समाज बीड जिल्हा व छत्रपती सकल मराठा विकास संस्था बीडच्या वतीने करण्यात आले आहे.

बीड शहरामध्ये मराठा समाजासाठी हक्काची एखादी जागा असावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. समाजातील विविध संघटना आणि कार्यर्त्यांनी गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्याकडे ही मागणी लावून धरली होती. त्याच अनुषंगाने आता बीड शहरातील अगदी मोक्याच्या ठिकाणी म्हणजेच राष्ट्रमाता जिजाऊ उद्यान राजीव गांधी चौकामध्ये नियोजीत ‘मराठा क्रांती भवन’ निर्माण करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या ठिकाणी मराठा समाजातील मुलींसाठी सुसज्ज वसतिगृह, अभ्यासिका आणि समाजातील लोकांसाठी हक्काची जागा या माध्यमातून उपलब्ध होणार आहे,काही महिन्यांपूर्वीच नगराध्यक्ष डॉ भारत भूषण क्षीरसागर यांनी एका कार्यक्रमात लवकरच जागा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले होते त्याची प्रत्यक्षात शब्दपूर्ती पूर्ण होत आहे,क्षीरसागर बंधूनी नेहमीच सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन जमेल त्या ताकदीने प्रश्नांची सोडवणूक केली आहे युवानेते डॉ योगेश क्षीरसागर यांनी देखील याबाबतीत पुढाकार घेतला होता

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!