बीड

आष्टीच्या सा.बा.विभागातील वरिष्ठ लिपीकास सहा हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडले

आष्टी- नळकांडी पुलाचे काम व खडीकरणाचे काम पूर्ण केलेल्या गुत्तेदाराचे बिल काढण्यासाठी 6 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. सदरील लाच स्वीकारताना आष्टीच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपीकास गुरुवारी रंगेहाथ पकडले.
आष्टी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालयातील वरिष्ठ लिपीक अंबादास विठ्ठल फुले (रा. बोरगाव कासारी, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) हा नळकांडी पुल व खडीकरणाच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी 6 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करत असल्याची तक्रार एका गुत्तेदाराने एसीबीकडे केली होती. एसीबीच्या पथकाने लाच मागणी पडताळणी करुन गुरुवारी बांधकाम विभागाच्या कार्यालयात सापळा लावला होता. यावेळी 6 हजारांची लाच स्विकारताना वरिष्ठ लिपीक अंबादास फुले याला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई एसीबीचे अधीक्षक राहुल खाडे, प्रभारी अपर अधीक्षक रुपचंद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे, पोलिस निरीक्षक रविंद्र परदेशी, पोलिस अंमलदार श्रीराम गिराम, राजेश नेहरकर, भरत गारदे यांनी पार पाडली. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!