महाराष्ट्र

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीला अपघात; टेम्पोने दिली जोरदार धडक

10 July :- राज्याच्या शिक्षणमंत्री आणि हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड या अपघातातून थोडक्यात बचावल्या आहेत. घटना अशी की, हिंगोली जिल्ह्यातील पिपल्स बँकेजवळ मोंढ्यातून भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअपने पालकमंत्र्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. ही घटना शनिवारी दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान घडली आहे. यामध्ये पालकमंत्र्यांच्या वाहनाच्या पाठीमागील बाजूचे किरकोळ नुकसान झाले आहे. त्यानंतर पोलिसांनी पिकअप चालकास ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले आहे. हिंगोलीच्या पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड शनिवारपासून हिंगोली जिल्ह्यात आहेत. शनिवारी त्यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली तसेच कोविड आढावा व कृषी विभागाची आढावा बैठक झाली.

आज सकाळी आकरा वाजता शासकिय रुग्णालयात ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांचा ताफा हिंगोलीच्या रामलिला मैदानाची पाहणी करण्यासाठी निघाला होता. त्यांचे वाहन पिपल्स बँकेजवळून जात असतांना मोंढ्यातून भरधाव वेगाने पिकअप गाडी मुख्य रस्तावर येत होते. यावेळी प्रा. गायकवाड यांच्या ताफ्यातील स्कॉटींग व्हॅन पुढे गेल्यानंतर पिकअप चालकाने वाहन रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न केला.
प्रसंगावधान राखून पालकमंत्र्यांच्या वाहन चालकाने वाहनाची गती वाढवली. त्यामुळे वाहन पुढे गेले. मात्र पिकअपचा या वाहनाला पाठीमागील बाजूस असलेल्या कोपऱ्याला धक्का लागला. यामध्ये वाहनाच्या पाठीमागील बाजूचा भाग थोडा घासल्या गेला. सुदैवाने या अपघातात कोणालाही इजा झाली नाही. या घटनेनंतर पोलिसांनी पीकअप व्हॅन चालकास ताब्यात घेऊन शहर पोलिस ठाण्यात नेले आहे. त्यानंतर पालकमंत्री प्रा. गायकवाड यांनी रामलिला मैदानावर पाहणी करून नंतर शासकिय विश्रामगृह येथे आल्या. त्यानंतर दुपारी प्रा. गायकवाड याच वाहनाने औरंगाबादकडे रवाना होणार असल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!