बीड, खा. प्रीतमताई मुंडे यांना मंत्रिमंडळात संधी न दिल्याने ऍड सर्जेराव तांदळे यांनी भाजपच्या जिल्हा सरचिटणीस पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे दिला आहे. बीड जिल्ह्याला मंत्रिमंडळात संधी न दिल्यामुळे यातून बीड जिल्ह्याच्या विकासाला मोठी खीळ बसणार असल्याचे यावेळी तांदळे यांनी म्हटले आहे.
मी अॅड.सर्जेराव भगवानराव तांदळे माझ्या बीड जिल्हा सरचिटणीस पदाचा राजीनामा देत आहे . बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय व कर्तव्यदक्ष खा . डॉ . प्रीतमताई गोपीनाथराव मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्यामुळे बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता नाराज झाली आहे . स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचा वटवृक्ष वाढवण्यासाठी अपार कष्ट घेतले असून पक्षाच्या वैभवात त्यांचे योगदान मोलाचे आहे . त्यांचा वारसा लोकनेते पंकजाताई व प्रीतमताई चालवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रीतमताई यांचा समावेश निश्चित होईल अशी आशा माझ्यासह जिल्ह्यातील जनतेला होती परंतु दुर्दैवाने असे घडले नाही मी 1989 पासून भारतीय जनता पार्टीचे निष्ठेने काम करत आहे गेल्या नऊ वर्षापासून पक्षाचा जिल्हा सरचिटणीस पदावर काम करीत आहे परंतु कालच्या घटनेने माझ्यासह जनतेला मोठा धक्का बसला आहे.मी बीड जिल्हा सर सरचिटणीस पदाचा राजीनामा देत असल्याचे ऍड सर्जेराव तांदळे यांनी म्हटले आहे.