बीड:- कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात 10 दिवसांचा लॉकडाऊन दि.25 मे रोजी रात्री 12 पर्यंत लावण्यात आलेला होता. मात्र आता त्यात आणखी 6 दिवसांची वाढ करण्यात आली असून दि.31 मे रात्री 12 पर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. याबाबत जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी आदेश काढले आहेत. केवळ भाजीपाला फळे विक्रीसाठी सकाळी 7 ते 9 सवलत देण्यात आली आहे. अन्य आस्थापना सुरू राहणार नाहीत असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
कोविड -१ ९ विषाणूचा संसर्ग रोखण्याकरीता दिनांक २५ मे २०२१ रोजीचे रात्रीचे १२ वाजेपासून ते ३१ मे २०२१ रोजीचे रात्रीचे १२ वाजेपर्यंत खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे .
- १. दिनांक २५.मे २०२१ रोजीचे रात्रीचे १२ वाजेपासून ते ३१ मे २०२१ रोजीचे रात्रीचे १२ चे या दरम्यान केवळ खालील आस्थापना पूर्णवेळ सुरु राहतील . सर्व औषधालये ( Medical ) , दवाखाने , निदान क्लिनीक , लसीकरण केंद्रे , वैद्यकिय विमा कार्यालये , फार्मास्युटिकल्या , फार्मास्युटिकल कंपन्या , इतर वैद्यकिय आणि आरोग्य सेवा ज्यात सहाय्यक उत्पादन आणि वितरण युनिट तसेच त्यांचे डिलर्स , वाहतुक आणि पुरवठा साखळी , लसींचे उत्पादन व वितरण , सॅनिटायझर्स , मास्क , वैद्यकिय उपकरणे , कच्चा माल युनिट आणि सहाय्य सेवा , पेट्रोल पंप व पेट्रोलियमशी संबंधित उत्पादने , टपाल सेवा इ . उपरोक्त अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या आस्थापना वगळता इतर कोणत्याही आस्थापना उपरोक्त दिवशी चालू राहणार नाहीत .
- २. दुध विक्री केवळ प्रत्येक दिवशी सकाळी ०७.०० ते १०.०० वाजेपर्यंत सुरु राहील .
- ३. भाजीपाला विक्रीस केवळ हातगाडीवरुन प्रत्येक दिवशी सकाळी ०७.०० ते ० ९ .०० वाजेपर्यंत परवानगी राहील .
- ४. गैस वितरण दिवसभर सुरु राहील
- ५. बैंक / ग्राहक सेवा केंद्र यांचे कामकाज प्रत्येक दिवशी सकाळी १०.०० ते दु .०१.०० वाजेपर्यंत केवळ शासकीय व्यवहार , पेट्रोलपंप व गैस एजन्सी धारकांचे व्यवहार , कृषी निविष्ठांशी संबंधित व्यवहार , वैद्यकिय कारणास्तव केले जाणारे व्यवहार , सर्व opr – bontaypartlor – a36 शासकीय योजनेचे लाभार्थी यांचे वेतनाबाबतचे व्यवहार , अत्यावश्यक सेवेशी संबंधित असणा – या आस्थापना यांना या वेळेत बँकेत जाऊन व्यवहार करण्यास मुभा असेल . दरम्यानच्या काळात एटीएम कैशच्या वाहनांना परवानगी असेल , तसेच दुपारी ०१.०० ते ०४.४५ वाजेपर्यंत बँकेचे कर्मचारी यांना केवळ अंतर्गत कामकाजास मुभा असेल .
- ६. शासकीय कार्यालये नियमित वेळेप्रमाणे सुरु राहतील . ( ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक असेल . )
- ७. लसीकरणा करीता ४५ बर्षावरील ज्या व्यक्तींना मेसेज आला आहे / आरोग्य विभागाचे पत्र आले आहे . त्यांनाच लसीकरणचा डोस घेण्यासाठी जाण्यास मुभा असेल . ( लसीकरणासाठी आलेला मेसेज / आरोग्य विभागाचे पत्र , आधार कार्ड सोबत असणे आवश्यक असेल . )
- ८. कृषी व्यवसायाशी संबंधित बि – बियाणे , खते , औषधे यांची जी दुकाने आहेत त्या दुकान मालकास आलेख्ने बि – बियाणे , खते , औषधे केवळ गोडाऊनला किवा दुकानामध्ये उतरुण घेण्यास मुभा असेल , तसेच कृषि विक्रत्याना शतकन्यांना -बियाणे , खते , औषधे विक्रीस / खरेदीस सकाळी ०७.०० ते दुपारी ०१.०० वाजेपर्यंत परवानगी असेल , १. नरेगाची कामे सुरु राहतील , त्या ठिकाणी सामाजिक अंतर , मास्क , सैनिटायझर चा व कोविड -१ ९ विषयक जे नियम आहेत से पाळणे बंधनकारक असेल .
- १०. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार यांनी दिनांक २६.०५.२०२१ पासुन सकाळी ०७.०० ते दुपारी ०१.०० या वेळेतच लाभाथ्यांना धान्य वितरण करण्यास मुभा राहील . ( राशनसाठी जाणा – या व्यक्तीच्या सोबत राशनकार्ड , आधार कार्ड असणे आवश्यक आहे . )
- ११. जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या मद्यविक्री अनुज्ञप्त्या पूर्णवेळ पूर्णपणे बंद राहतील . दिनांक २५/०५/२०२१ रोजीचे रात्रीचे १२.०० वाजेपासून ३१/०५/२०२१ रोजीचे रात्रीचे १२.०० वाजेपर्यंत या कालावधीत निबंध असलेल्या आस्थापना चालू असल्याचे निदर्शनास आल्यास त्या सिल करण्यात येऊन त्यांचा परवाना रत करण्याची कारवाई करण्यात येईल , सदरच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस याणा आणि सर्व संबंधित विभागाची राहील.