बीड(प्रतिनिधी):-बीड जिल्ह्यातील ग्रामीण जनतेच्या हितासाठी सध्याच्या कोविडच्या महामारीला थोपविण्याच्या उद्देशाने शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी अंथरवण पिंप्री तांडा येथील श्री. सद्गुरू बंजारा सेवा संचालित माध्यमिक आश्रम शाळा येथे 500 बेडचे स्व.बाळासाहेब ठाकरे कोविड सेंटर स्थापन केले असून या कोविड सेंटरचे उद्घाटन शुक्रवार दि. 7 मे रोजी नगरविकास मंत्री ना.एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी दिली.
बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कमी पडत असून ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधीत रुग्ण आढळत असल्याने जनतेच्या आरोग्य हितासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या संकल्पनेतून बीड जिल्हा शिवसेनेच्या अंथरवणपिंप्री तांडा येथे सर्व सोयींनी अद्ययावत असणारे 500 बेडचे सुसज्ज असे स्व.बाळासाहेब ठाकरे कोविड सेंटर उभारले असून या कोविड सेंटरचे उद्घाटन राज्याचे नगरविकास मंत्री ना.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते शुक्रवार दि. 7 मे रोजी होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला ना.शिंदे हे हेलिकॉप्टरने येणार आहेत.
ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्य हितासाठी स्व.बाळासाहेब ठाकरे कोविड सेंटर स्थापन केले असून 500 बेडची सुविधा येथे करण्यात आली आहे. गरज पडली तर आणखीन बेडची सोय या ठिकाणी करण्याची तयारी असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी दिली.