बीड, दि. 6 (लोकाशा न्यूज) : मराठा आरक्षणासाठी समाजातील प्रत्येकाने आपले योगदान दिले, या आरक्षणामुळे आपल्या पुढच्या पिढीचे तरी भल्ले होईल असे सर्वांना वाटत होते, मात्र बुधवारी मराठा आरक्षणाविषयी सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला, त्याबद्दल सर्व मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे. एका रात्रीत बहुमताच्या जोरावर 370 कलम हटविणार्या केंद्रीय सरकारने घटनादुरूस्ती करुन सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय संसदेत घ्यावा किंवा पन्नास टक्के आरक्षणाचीच्या मर्यादित वाढ करून मराठ्यांना आरक्षण द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अॅड प्रज्ञा खोसरे यांनी केली आहे.