बीड : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने लॉकडाऊन काळात विना परवानगी कोविड सेंटर बाहेर पडून मोकाट फिरणाऱ्या तीन कोरोनाबाधितांवर वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
कृष्णा शंकर राठोड ( वय २ ९ ) , नवनाथ जयराम राठोड ( वय ४५ ) , रामराव भीमा चव्हाण ( वय ३५ सर्व रा.हरिश्चंद्र पिंपरी , ता.वडवणी जि.बीड ) असे गुन्हा दाखल झालेल्या कोरोनाबाधितांची नावे आहेत . हे तिघे बाधित असल्याने वडवणी शहराजवळील साळींबा रोडलगत असलेल्या कोरोना केअर सेंटरमध्ये २७ एप्रिलपासून भरती झालेले आहेत . त्यांनी सेंटरवरील कार्यरत कर्मचाऱ्यांना काहीही न सांगता विना परवानगी बाहेर पडले . सेंटरवर परतले असता कर्मचाऱ्यांनी विचारपूस केल्यानंतर फळे खरेदी करण्यासाठी गेल्याचे स्पष्ट झाले . बाधित व्यक्तींना कोरोना संसर्ग व शासन आदेशाबाबत वारंवार सूचना देऊन व ज्ञात असूनही नियमांचे उलगन केले . व समाजातील इतर नागरिकांच्या सम्पर्कत आले. याप्रकरणी समुदाय आरोग्य अधिकारी दिपक गावडे यांच्या फिर्यादीवरून वडवणी पोलीस ठाण्यात फियादीवरून वडवणी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ , साथरोग अधिनियम १८ ९ ७ सह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आसेफ शेख हे करत आहेत .