बीड, दि. 2 (लोकाशा न्यूज) : सध्या कोरोनाच्या संकटातही सट्टेबाजी जोरात सुरू असल्याचे दिसून येत आहे. मागच्या चार पाच दिवसांपुर्वी अंबाजोगाई पोलिसांनी सट्टा खेळणार्यांवर मोठी कारवाई केली होती, या प्रकरणाची चर्चा थांबतेय ना थांबतेय असाच प्रकार बीडमध्येही सुरू असल्याचे समोर आले होते. त्यानुसार बीडमध्ये सट्टेबाजी करणार्यांना पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांनी चांगलाच दणका दिला आहे. पेठ बीड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सट्टा खेळणार्यांचा खेळ त्यांनी उद्वस्त केला आहे. याप्रकरणी पोलिस नाईक गणेश जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तब्बल चाळीस जणांवर गुन्हा दाखल करून त्यांच्याकडील 2 लाख 99 हजार रूपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे. यापैकी चार आरोपींना गजाआड करण्यात आले आहे. पाटील यांच्या याच कारवाईमुळे सट्टेबाजांमध्ये आता मोठी खळबळ उडाली आहे.
शेख सर्फराज शेख ईमाहीम (वय 26 वर्ष रा.उमर मस्जिद जवळ बीड मामला पेठ बीड), शेख सदाम शेख खुदबोधिन (वय 27 वर्ष रा. आजीजपुरा केज. हा.मु मोमीनपुरा पेठ बीड, शेख मतीन शेख इस्माईल (वय 36 वर्ष रा.बीड मामला आशोक नगर पेठ बीड), शेख शहबाज शेख इलीयास (वय 24 वर्ष रा. शहेंशावली दर्गाजवळ पेठ बीड, शेख ऐजाज शेख अफजल (रा. मोमीनपुरा बायपास पेठ बीड), मोमीन वसीम मोमीन मतीन (रा.बीड मामला पेठ बीड, मोमीन सर्फराज मोमीन अन्सार (रा.बीड मामला पेठ बीड), शेस जुनेद शेख रहीम (रा.दाऊदपुरा पेठ बीड), सय्यद फुरकान सय्यद जकी (रा. एकबाल कॉलनी तकीया मस्जीद जवळ बीड), शेख दानीश शेख सलीम (रा. एकबाल कॉलनी तकीया मस्जीद जवळ बीड), शेख मोहसीन शेख ईग्राहीम (रा. बीड मामला पेठ बीड), शेख शकील शेख बाबू (रा.बीड मामला पेठ बीड), शेखा सोहेल शेरस ईबाहीम (रा.बीड मामला पेठ बीड), शेख हसन (रा.बाबा चौक इस्लामपुरा पेठ बीड), शेख मोईज (रा.महमदीयाँ कॉलनी पेठ बीड यांच्यासह इतर 20 ते 25 जणांवर एक मे रोजी रात्री साडे दहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपी आशोकनगर शाळेच्या पाठीमागे बीड मामला पेठ बीड येथे सट्टा खेळत होते. यावेळी सदर आरोपींना अटक करून त्यांच्याकडूनी सट्टा जुगाराचे साहित्य, नगदी रोकड, चार मोबाईल, चार मोटारसायकल असा एकुण 2 लाख 99 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील आरोपी हे स्वत:च्या फायद्यासाठी पत्र्याचे मोकळ्या शेड मध्ये विनापरवाना व बेकायदेशिर रित्या मुंबई इडियन्स विरुध्द चेन्नई सुपर किंग्ज या आयपीएलच्या चालु असलेल्या सामन्यावर कमी पैशात जास्त पैशाचे आमिष दाखवून सट्टयाचा जुगार खेळत आणि खेळवित असतांना पहिले चार जण जागीच मिळुन आले तर इतर आरोपी पोलिसांना बघून पळून गेले. त्यांनी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दिलेल्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचे ग्राह्य धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोह उबाळे हे करीत आहेत.