बीड

आ. संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या ग्रामीण भागात आरोग्य केंद्रास भेटी, लसीकरण मोहिमेबाबत केली जनजागृती; आरोग्य विभागास दिल्या सूचना

 बीड (प्रतिनिधी):- बीड विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रास आ. संदीप भैय्या क्षीरसागर यांनी भेटी दिल्या. त्यांनी प्रत्येक आरोग्य केंद्रात लसीकरण मोहीम व्यवस्थित चालू आहे का याची पाहणी केली. लसीकरण मोहिमे संबंधी आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांच्याशी चर्चा केल,नागरिकांनमध्ये जन जागृती करत आरोग्य विभागस आवश्यक त्या सूचना त्यांनी केल्या आहेत.बीड तालुक्यातील लसी घेण्यासाठी आलेल्या नागरिकांशी आ. संदीप क्षीरसागर यांनी संवाद साधला कोरोना विषयी जनजागृती केली. लस घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी न करता सुरक्षित अंतर ठेऊन बसावे अशी विनंती केली.शहरात व ग्रामीण भागात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तरी, आपण सर्वानी काळजी घ्यायची आहे.सर्दी, खोकला, अंगदुखी, डोक, ताप व इतर काही लक्षणे आढळून आल्यास त्वरीत डॉक्टर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन ही आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.धीर, संयम, दक्षता आणि परस्पर सहकार्याच्या बळावर आपण या महामारी रूपी संकटावर निश्चित मात करू असा विश्वास आ. संदीप क्षीरसागर यांनी आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्याशी बोलताना व्यक्त केला आहे. राजुरी नवगन, चराटा, साकक्षालपिंपरी आदी  आरोग्य केन्द्रास भेटी देत असताना अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!