बीड, दि. 29 (लोकाशा न्यूज) : कोरोना महामारी ने जिल्ह्यात थैमान मांडले. शहरापासून गाव खेड्या पर्यंत मृत्यूचे तांडव चालूच आहे.रुग्णांचे नातेवाईक प्राण वाचवण्यासाठी रेमडिसिवर इंजेक्शन च्या शोधात वण वण फिरतात तर निष्पाप जीव इंजेक्शन अभावी आपले प्राण सोडत आहेत .गेली तीन हप्त्यापासून रेमडेसीवर टंचाई व होणारा काळाबाजार यावर सर्व स्तरातून टीका होत असताना दुर्दैवाने या कळ्याबाजाराची दखल सत्ताधारी का घेत नाहीत.हे रहस्य कायम आहे. म्हणूनच आज ही रेमडेसीवर काळाबाजार तेजीत आहे. जनता प्रचंड संताप व्यक्त करते.काहींनीआपले प्राण गमावले. तरी अद्याप बीड जिल्ह्याला मुबलक व सुरळीत रेमडेसीवर पुरवठा होत नाही.जीवन मरणाच्या संघर्षात अडकलेल्या जीवांना इंजेक्शन मिळत नाही. सामान्य रुग्णांच्या प्राणांची कदर राहिली नाही. म्हणूनच या बाबतीत पालकमंत्री अथवा कोणत्याही सत्ताधार्यांनी रेमडेसीवर कळ्याबाजारावर अंकुश ठेवण्यासाठी कोणताही प्रयत्न करणे सोडाच यावर साधे भाष्य करण्याची सुबुद्धी कोणत्याही सत्ताधारी नेत्याला सूचना नाही. लोक तडफडत असताना बिनधास्तपणे हा गोरख धंदा चालूच आहे.बाहेर जिल्ह्यात साठा गेला तरी मूग गिळून गप्प का. कोठेतरी निश्चितच पाणी मुरते आधाराशिवाय हा काळाबाजार होऊ शकत नाही. असा आरोप भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेद्र मस्के यांनी केला असून बीड जिल्ह्यसाठी किती रेमडेसीवर इंजेक्शन आले. कोणत्या रूग्णांना कशा प्रकारे वाटप करण्यात आले. याची सविस्तर माहिती पालकमंत्र्यांनी जाहीर करावी. काही महाभाग सताधारी श्रेयाच्या लालसेने प्रसिद्धीच्या झोतात राहाण्यासाठी खोटी माहिती पुरवून जनतेच्या भावनेसी खेळत आहे. कधी दहा हजार तर कधी आठावीशे इंजेक्शन आणल्याचा बोगस दावा जयदत्त क्षिरसागर करतात. जनता मृत्यू सी झगडत असताना राजकारणाची तलप भागवू नये याचे भान राहिले नाही. खरेच त्यांच्या प्रयत्नातून एवढी इंजेक्शन आणली असतील तर मग टंचाई कशी. क्षिरसागरांनि कोरोना संकटात तरी हा लबाडीचा धंदा बंद ठेवावा. असा सूचक सल्ला राजेंद्र मस्के यांनी दिला. कोरोना चे संकट भयानक आहे. ही राजकारणाची वेळ नाही.प्रत्येक रूग्णाचा जीव वाचवण्याची जबाबदारी शासन प्रशासनाची आहे. सामान्य जनतेच्या जीवांसी खेळण्याचा अधिकार कोणाला ही नाही. महामारीतून जीव वाचवण्यासाठी रूग्ण सैरभैर झाले आहेत.जीवन मरणाच्या धडपडीत वशिलेबाजी व खोटारडे पणा नको. आरोगयंत्रणेवर प्रचंड ताण असताना औषधांचा काळाबाजार लांच्छनास्पद आहे. नैतिकतेची चाड बाळगून प्रत्येक गरजवंताला वैधकीय सेवा पुरवून त्यांच्या जिवित्वाची जबाबदारी सत्ताधारी मंडळी नी प्रामाणिकपणे निभवावी असे आवाहन राजेंद्र मस्के यांनी केले.